कॅन्सर हा गंभीर आजार असला तरी सुद्धा योग्य ते उपचार केल्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा या आजारामुळे झालेल्या त्रासामधून बाहेर पडता येऊ शकते परंतु जर कॅन्सर(Cancer) परत आला म्हणजेच पुन्हा सक्रिय झाला तर अशावेळी या परिस्थितीला सामोरे जाणे कठीण होऊ शकते परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य उपचार, सपोर्ट सिस्टीम आणि योग्य मानसिकता ठेवून कॅन्सरचे रुग्ण यावर मात करू शकतात. कॅन्सर परत आला तर काय केले पाहिजे यावरच आजच्या ब्लॉगमध्ये आपण माहिती बघणार आहोत.
सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिकता –
- कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी तसेच त्या रुग्णाच्या कुटुंबीयांसाठी तो काळ खूप अवघड असतो परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा जर रुग्णांनी तसेच रुग्णाच्या कुटुंबीयांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि चांगली मानसिकता ठेवली तर या परिस्थितीला सुद्धा उत्तमरीत्या सामोरे जाता येऊ शकते.
- कॅन्सर परत आल्यास कॅन्सर परत आला आहे ,या गोष्टीचा स्वीकार करा हे अवघड असू शकते परंतु स्वीकार केल्यास या परिस्थितीमधून पुढे जाणे आणि त्यातून बाहेर पडणे सोपे होऊ शकते.
- जर कॅन्सर परत आला तर अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन असणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळे आपण पुन्हा एकदा या परिस्थितीमधून बाहेर पडून याबद्दल एक आत्मविश्वास मिळतो.
म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य मानसिकता ही या परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची आहे.
कॅन्सरवर उपचार घेणे –
जर कॅन्सर परत आला तर तो कॅन्सर कोणत्या प्रकारचा आहे तसेच सध्या त्या कॅन्सरची काय परिस्थिती आहे यावर आधारित डॉक्टर केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी, सर्जरी तसेच इतर कोणते उपचार कॅन्सरवर केले पाहिजेत याचा निर्णय डॉक्टर कॅन्सरची परिस्थिती आणि प्रकार लक्षात घेऊन घेतात यासाठी लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधून योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
Read More Cancer-Related Blogs – तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) बरा होतो का ?
आहार आणि शारीरिक स्वास्थ्य –
1. कॅन्सर मुळे नक्कीच शरीरावर तसेच मनावर सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो परंतु कॅन्सरशी लढण्यासाठी मानसिक दृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच शारीरिक दृष्ट्या सक्षम असण्यासाठी व्यायाम आणि योग्य आहार हे खूप महत्त्वाचे आहे.
2. शारीरिक दृष्ट्या सक्षम असण्यासाठी संतुलित आहार घेणे म्हणजेच त्यामध्ये सर्व पोषक तत्वांचा समावेश असणे आवश्यक आहे यासाठी प्रोटीन युक्त आहार तसेच फळे, भाज्या यांचा समावेश आहारामध्ये करावा आणि प्रोसेस्ड फूड तसेच शरीरासाठी घातक पदार्थ खाणे टाळावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणत्या प्रकारचा व्यायाम केला पाहिजे हे ठरवून व्यायाम करावा.
3. शरीरासाठी पुरेसे पाणी पिणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे, यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि शारीरिक समस्येमधून बाहेर पडणे सुद्धा सोपे होते.
कुटुंब आणि जवळच्या लोकांचा पाठिंबा –
कॅन्सर झालेल्या रुग्णासाठी तसेच त्याच्या कुटुंबीयांसाठी सुद्धा हा काळ खूप अवघड असतो परंतु या काळामध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णाचा कुटुंबीयांसोबत तसेच नजीकच्या मित्र-मैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने संवाद होणे सुद्धा गरजेचे असते यामुळे कुटुंबीयांकडून तसेच मित्र-मैत्रिणींकडून मानसिक आधार मिळू शकतो आणि त्यामुळे उपचारादरम्यान रुग्ण सकारात्मक दृष्टिकोन ठेवू शकतो आणि उपचार घेणे सुद्धा रुग्णासाठी सोपे होऊ शकते. म्हणूनच कॅन्सरच्या उपचारादरम्यान कुटुंब आणि जवळच्या लोकांचा पाठिंबा सुद्धा खूप महत्त्वाचा असतो.
कॅन्सर सपोर्ट ग्रुप्स –
जर कॅन्सर सपोर्ट ग्रुपला जॉईन केले तर त्यामुळे इतर कॅन्सर रुग्णांसोबत संवाद साधता येऊ शकतो तसेच त्या रुग्णांच्या अनुभवांमधून सुद्धा खूप काही शिकता येऊ शकते आणि यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांना प्रेरणा मिळू शकते आणि कॅन्सर मधून बाहेर पडण्यासाठी नवी उभारी रुग्णांना मिळू शकते म्हणून जे कॅन्सर सपोर्ट ग्रुप्स असतात त्या ग्रुपला सुद्धा कॅन्सर झालेले रुग्ण जॉईन होऊ शकतात.
अशाप्रकारे जर कॅन्सर परत आला तर घाबरून न जाता सकारात्मक दृष्टिकोन आणि मानसिकता ठेवून डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यावा. डॉक्टर कॅन्सरचा प्रकार आणि परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर योग्य ते उपचार नक्कीच करतील. अशा परिस्थितीमध्ये आपले कुटुंबीय आणि नजीकचे मित्र मैत्रिणी यांच्याशी सुद्धा संवाद साधावा यामुळे सकारात्मक दृष्टिकोन मिळेल तसेच काही छंद असल्यास ते जोपासावे जेणेकरून कॅन्सरवर लक्ष केंद्रित होणार नाही आणि मन सुद्धा इतर गोष्टींमध्ये रमेल. योग्य आहार आणि व्यायाम सुद्धा अशा परिस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण आहे. अशाप्रकारे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नक्कीच कॅन्सर सारख्या परिस्थितीशी लढता येऊ शकते आणि त्यामधून बाहेर पडता येऊ शकते.
For expert guidance, it is always recommended to consult a specialist. Dr. Sumit Shah, a renowned cancer specialist in Pune