प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग (Cancer of the Prostate Gland) हा पुरुषामध्ये होणारा कॅन्सर आहे. हा आजार वेळेत न ओळखल्यास धोकादायक होऊ शकतो. ज्यांच्या रक्ताच्या नातेवाइकांमध्ये म्हणजे वडील, काका, आजोबा, भाऊ अशा नातेवाइकांमध्ये प्रोस्टेटचा कर्करोग झाल्याची घटना असेल तर त्यांना हा आजार होण्याची दाट शक्यता असते. मधुमेही, स्थूल, धूम्रपान करणारे, नसबंदी झालेले पुरुष यांनाही प्रोस्टेटचा कर्करोग होऊ शकतो. किरणोत्सर्ग (Radiation) हेही प्रोस्टेटच्या कर्करोगाचे एक कारण असू शकते. प्रोस्टेटच्या कर्करोगात बीपीएचमुळे (Because of BPH) होणाऱ्या लघवीच्या त्रासासमवेत इतरही काही लक्षणे आढळून येतात. त्यापैकी लघवीतून रक्त जाणे हे लक्षण सर्वांत महत्त्वाचे असते. कर्करोगग्रस्त पेशी रक्तातून शरीराच्या अन्य भागात पसरतात. प्रोस्टेटग्रंथी ही मुत्राशयाच्या खालच्या भागात स्थित असून तिचे मुख्य कार्य हे वीर्यनिर्मितीचे (Semen Production) असते. साधारण वयाच्या पन्नाशीनंतर हा आजार होतो. वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारमानात वाढ होत जाते. प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशीमधील गुणसूत्रामध्ये बिघाड होऊन पेशीची अनियंत्रित वाढ होते. या वाढीतून निर्माण होणाऱ्या गाठीला प्रोस्टेट कॅन्सर म्हणतात.
लक्षणे (Symptoms of Prostate Cancer in Marathi)-
- वारंवार लघवीला जाणे
- लघवी मध्येच थांबणे
- लघवीतून रक्त जाणे
- लघवीसाठी जोर लावावा लागणे
- पाठ, खुब्यामध्ये दुखणे
- कंबरेच्या खालच्या भागात तीव्र वेदना
- मणक्याची हाडे, यकृत. त्यामुळे या रुग्णांमध्ये कंबर, मांडीची हाडे, खुबा, बरगड्या यामध्ये तीव्र वेदना.
ही लक्षणे वेगवेगळ्या पुरुषांत वेगवेगळी असू शकतात. या कर्करोगाचं निदान सुरवातीच्या टप्प्यात झालं तर त्यावर उपचार करणे शक्य होते. कारण त्यावेळी हा कर्करोग प्रोस्टेट ग्रंथीपुरताच मर्यादित असतो. यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर हा हळूहळू शरीराच्या सर्व भागात पसरतो.
प्रोस्टेटग्रंथी (Prostate Gland) वाढली असण्याची शंका आल्यावर काही तपासण्या केल्या जातात. पोटाची, ओटीपोटाची सोनोग्राफी ही फार महत्वाची तपासणी असते. ग्रंथीचा आकार व मूत्रवीरेचनावर प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याचा परिणाम हे सोनोग्राफीत समजते. कर्करोगाचे निदान प्रोस्टेट ग्रंथीतून एक सूक्ष्म तुकडा काढून तपासून करतात.
प्रोस्टेट कर्करोग होण्याची कारणे –
- शरीराची चरबी वाढणे
- अनुवंशीकता (Heredity)
- वाढलेले वय
या कर्करोगाचे निश्चित कारण अजून सिद्ध झालेले नाही.प्रोस्टेट ग्रंथीचा हाडांशी जवळचा संबंध असतो, म्हणूनच हा कर्करोग हाडांमध्ये सहज पसरू शकतो. हे फुफुस, यकृत, मेंदूत आणि लिम्फ नोड्स मध्ये देखील पसरू शकतं. या समस्येवर संकोच न बाळगता डॉक्टरांशी चर्चा करणे गरजेचे आहे. कुठलीही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना त्वरित भेटणे उपयुक्त ठरते.प्रो लाइफ केअर सेंटरमध्ये याचे अचूक निदान आणि उपचार होतात.
डॉ. सुमित शाह
डॉ. सुमित शाह प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट (Prolife Cancer Center and Research Institute) संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत. ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन(Surgical Oncology and Laproscopic Surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे.डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेले आहेत.