कॅन्सर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात परंतु सामान्यतः महिलांमध्ये आढळून येणारा कॅन्सर हा स्तनांमध्ये आढळून येतो. स्तनांचा कॅन्सर (breast cancer) हा गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये वाढत चालला आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या इतर कॅन्सरच्या प्रमाणापेक्षा ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण हे सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे. बऱ्याच महिलांना काही दिवसांपर्यंत हे ज्ञात नसते की आपल्याला स्तनांचा कॅन्सर आहे, त्यामुळेच घरच्या घरी का होईना स्तनांची तपासणी करणे आवश्यक आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण घरच्या घरी स्तनांची तपासणी ( self breast examination ) कशी करायची ,हे जाणून घेणार आहोत.
स्तनांचा कर्करोग म्हणजे काय ?
उत्पपरिवर्तनामुळे किंवा डीएनए मधील बदलामुळे स्तनांच्या पेशींचा कर्करोग होऊ शकतो. काही वेळा स्तनांचा कर्करोग हा पालकांकडून पसरू शकतो परंतु अशा केसेस पेक्षा बऱ्याच केसेसमध्ये स्तनांच्या कर्करोगाची इतर कारणे असतात. डीएनए जीन्स मध्ये असतात आणि हे डीएनए पेशींनी कसे कार्य करायचे ही भूमिका बजावतात परंतु ज्यावेळी डीएनए बदलते त्यावेळी पेशींचे विभाजन कशाप्रकारे होते यावर परिणाम होतो आणि पेशींचे जर अनियंत्रित विभाजन झाले तर ट्यूमर तयार होतात. स्तनांच्या कॅन्सरचे सुद्धा प्रकार आहेत त्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाची उत्पत्ती ही स्तनाच्या विविध भागांमध्ये होऊ शकते.
स्तनांची घरच्या घरी तपासणी कशी करायची ?
स्तनांची तपासणी ही आरशासमोर उभे राहून आणि झोपून केली जाऊ शकते. स्तनांची घरच्या घरी तपासणी करण्यासाठी पुढील स्टेप्स लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे स्तनांची तपासणी करू शकता :
१. आरशासमोर उभे राहिल्यानंतर स्तनांचा आकार आणि रंग लक्षात घ्यावा त्याचबरोबर स्तनांवर सूज , मंदपणा किंवा इतर काही बदल जाणवत असल्यास त्यावर लक्ष द्यावे.
२. स्तनांची तपासणी आरशासमोर उभे राहून करत असताना स्त्रियांनी त्यांचे दोन्ही हात डोक्याच्या वर करून दोन्ही स्तनांमधील समान बदल लक्षात घेतले पाहिजे, हात वर केल्यामुळे स्तनांचा खालील आणि वरील भाग स्पष्टपणे बघता येतो.
३. महिलांनी त्यांच्या स्तनामधून कोणताही स्त्राव किंवा द्रव पदार्थ निर्माण होत असल्यास त्याकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.
४. स्तनामध्ये काही गुठळ्या झाल्या आहेत का हे तपासण्यासाठी स्त्रियांनी पाठीवर व्यवस्थित पद्धतीने झोपावे असे केल्यामुळे स्तनाच्या उती समान रीतीने पसरल्या जातात. डाव्या हाताने उजव्या स्तनाची आणि उजव्या हाताने डाव्या स्तनाची तपासणी करणे योग्य आणि सोपी पद्धत आहे. बोटांच्या सहाय्याने स्तनावर गुठळ्या जाणवत आहे का हे तपासले पाहिजे.
५. बसलेले असताना किंवा उभे असताना स्तनांमध्ये गुठळ्या जाणवू शकतात, बसून किंवा उभे असताना स्तनांच्या उती मधील बदल तसेच काही विकृती असल्यास ती तपासली जाऊ शकते. अशी स्थिती स्तनांचा वरील भाग तसेच बगलांजवळील भाग तपासण्याकरिता उपयोगी आहे.
स्तनांची घरच्या घरी तपासणी का करावी ?
– स्तनांची स्व तपासणी केल्यामुळे स्तनांचा कॅन्सर होण्यापासून आपण वाचू शकतो, जर स्तनांची तपासणी केली आणि त्यामध्ये कॅन्सरचे काही लक्षणे जाणवल्यास कॅन्सरचा जर सुरुवातीचा टप्पा असेल तर अधिक चांगले उपचार व्यवस्थित रित्या करता येणे शक्य आहे.
– स्तनांचा कॅन्सर असल्यास त्याचे निदान लवकर होण्यामध्ये मदत होईल.
– स्तनांची तपासणी केल्यामुळे स्तनांमध्ये गुठळ्या होणे, अनियमित असणे तसेच त्वचेचे जाड होणे यांसारख्या समस्यांबद्दल सुद्धा माहिती मिळेल.
– स्तनांची घरच्या घरी तपासणी केल्यामुळे अगदी कुठलाही खर्च न करता ही तपासणी केली जाऊ शकते.
– घरच्या घरी स्तनांची तपासणी करण्यासाठी कुठल्याही उपकरणांची आवश्यकता नाही.
* सर्व महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की स्तनांमध्ये आढळणाऱ्या सर्वच गाठी ह्या कर्करोगाच्या नसतात.
* घरच्या घरी स्तनांची तपासणी ही मासिक पाळीच्या काही दिवसांनी ( चार ते पाच दिवसांनी ) प्रत्येक महिन्याला कमीत कमी एक वेळा तरी केली पाहिजे.
*स्तनांची तपासणी ही स्तन मऊ असताना केली पाहिजे.
* ज्यावेळी महिला घरच्या घरी स्तनांची तपासणी करतात त्यावेळी जर तपासणी दरम्यान स्तनांच्या कर्करोगासंबंधी किंवा इतर आजारासंबंधी काही लक्षणे आढळल्यास महिलांनी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे संपर्क साधला पाहिजे.
आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघितले की घरच्या घरी स्तनांची तपासणी कशा रीतीने करता येऊ शकते. स्तनांच्या कॅन्सरबाबत महिलांच्या मनामध्ये बरेच समज गैरसमज असतात, आपल्या मनामध्ये येणाऱ्या शंकेचे निरसन वेळच्यावेळी करणे सुद्धा आवश्यक असते.
जर तुम्हाला सुद्धा स्तनांचा कॅन्सर किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या कॅन्सर यासंबंधीमधील कुठलीही शंका असेल तर प्रो लाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ( Prolife Cancer centre and research institute ) , पुणे यांच्याशी संपर्क साधू शकता. प्रो लाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या https://www.prolifecancercentre.co.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.