किडनी (Kideny)… म्हणजेच मूत्रपिंड. पण किडनी हा शब्द सर्वांशी जास्त परिचित आहे. शरीरातील टाकाऊ पदार्थाचे लघवीवाटे विसर्जन करणे व रक्तशुध्दीकरण ही काही महत्वाची कार्ये करणारा हा अवयव.
यकृत आणि जठराच्या खालच्या बाजूस दोन्ही बाजूला हाताच्या मुठीच्या आकाराच्या या दोन किडन्या… शरीरातील यांच महत्व म्हणाल तर दोनपैकी किमान एकीचं तरी निरोगी अस्तित्व माणसाला जीवंत ठेवतं पण याच महत्त्वाच्या अवयवाला कॅन्सरची लागण झाली तर…
इतर कॅन्सरप्रमाणेच हा किडनीचा कॅन्सरदेखील हळूहळू नकळतपणे वाटचाल करणारा आहे. पटकन दिसुन येणारी लक्षणे नाहीत पण याची छुपी लक्षणे जर वेळीच ओळखली व योग्य ठिकाणी निदान व उपचार झाल्यास याच्या तावडीतुन सुटका होऊ शकते. हा कॅन्सर कधीही कोणालाही होऊ शकतो यामध्ये वय व लिंग याने काही फरक पडत नाही धोणालाही होऊ शकतो पण तरीही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या कॅन्सरचे प्रमाण कमी आहे. लहान मुलांमध्ये तर क्वचित प्रमाण. म्हणूनच याबाबत पुरेशी माहिती असणं गरजेचं आहे.
तसं पाहता किडनीच्या कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत परंतु सर्वसाधारणपणे भारतामध्ये जास्त प्रमाणात आढळतो तो “किडनीतील पेशींचा कॅन्सर “[Renal cell Cancer]
किडनी कॅन्सरचे लक्षणे (Kidney Cancer Symptoms in Marathi)
1) लघवीतून रक्त जाणे (हे अत्यंत मुलभूत लक्षण समजले जाते).
2) मूत्रपिंडावर गाठी.
3) अशक्तपणा, सुस्तपणा.
4) घाम सुटणे, सततचा ताप.
5) वजन कमी होणे, भूक न लागणे
6) पोटदुखी/ पाठदुखी
7) वारंवार पाय सुजणे
8) हाड वेदना
हि उपर्युक्त लक्षणे किडनी कॅन्सरची (Kidney Cancer) संभाव्यता दर्शवितात. याची इतरही कारणे असू शकतात पण यांबाबत जागरुकता आत्यंतिक गरजेची आहे. आता विचार करुयात कोणत्या कारणांनी हा किडनीचा कॅन्सर होऊ शकतो?
1) 60 नंतरचे वय.
2) स्थूलता (किडनी कॅन्सरच्या कारणांपैकी 25% भाग याच्या वाट्याला येतो).
3) डिएनए म्यूटेशन (DNA Mutation)
4) अति रक्तदाब
5) सुस्तपणा व व्यायामाचा अभाव.
6) किडनीचे इतर दीर्घ आजार.
7) बेंझिनसारख्या सुगंधित रसायनांचा सततचा संपर्क.
8) किडनी ट्रान्सप्लांट. (Kideny Transplant)
9) किडनी कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास (साधारणपणे यामधील 2 ते 4 % कॅन्सर हे आनुवंशिक असतात).
किडनी कॅन्सरचे निदान होण्यास आवश्यक चाचण्या (Tests necessary to diagnose kidney cancer in Marathi)
1] रक्त लघवी चाचणी (Blood Urine Test).
2] इमेजिंग चाचण्या (Imaging Test)-
1) अल्ट्रासाउंड (Ultrasound).
2) सी.टी.स्कॕन (C.T Scan).
3) बोन स्कॕन (Bone Scan).
वेळीच लक्ष न दिल्यास उपचाराला उशिर झाल्यास रुग्णांमध्ये गुंतागुंतीच्या समस्या उभ्या राहतात. रुग्णाच्या शरीरातील कॅल्शिअमची पातळी वाढते, रक्तदाब खूप वाढतो, कॅन्सरचा प्रादुर्भाव इतरत्र व्हायला सुरुवात होते. यकृताशी संबधित समस्या उभ्या राहतात, तांबड्या रक्तपेशींची संख्या वाढते म्हणून वेळीच उपचार घेणं क्रमप्राप्त ठरते.
किडनी कॅन्सरचा उपचार (Kidney Cancer Treatment in Marathi)
कॅन्सरचा प्रादुर्भाव दोन्ही किडन्यांमध्ये आहे का? रोगाचा टप्पा व प्रकार, रुग्णाचे वय, शारीरिक क्षमता या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून उपचारांची दिशा ठरवावी लागते.
किडनी कॅन्सर शस्त्रक्रिया (Kideny Cancer Surgery in Marathi)
- नेफ्रेक्टॉमी (Nephrectomy).
- नेफ्राॕन स्पायरिंग सर्जरी (Nephron Spiring Surgery).
- टार्गेट थेरापी (Target Therapy).
- इम्यूनोथेरपी (Immunotherapy).
- रेडीओथेरपी (Rediaotherapy).
उपचारांची अंतिमतः यशस्विता तो उपचार कुठे? किडनी कॅन्सरचे लक्षणे व उपचार कसा? व किती कौशल्यपूर्णरितीने केला जातो यावर त्याची यशस्विता अवलंबून असते.
डॉ. सुमित शहा यांनी आतापर्यंत 20000 पेक्षा अधिक रुग्णांना सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. किडनी कॅन्सर व इतर सर्व प्रकारच्या कर्करोगासंबंधित अधिक माहिती किंवा तपासणीसाठी पुण्यातील स्वारगेटजवळ असलेल्या सेव्हन लव्हज चौकात असणाऱ्या प्रोलाईफ कॅन्सर सेंटरला (Prolife Cancer Centre) अवश्य भेट द्यावी.
डॉ. सुमित शहा.