ढोलताशांच्या गजरात , गुलालाची मुक्त उधळण, गणपतीबाप्पाचं स्वागत ….. गुलाबी रंगानं माखुन निघालेला….. डिजेच्या तालावर सैरभैर होऊन थिरकणारा राहूल …..
त्याच्या जीवनात श्री गणेश कृपेनं एक सप्तरंगी इंद्रधनुष्य पुन्हा फुललं होतं … त्याला स्वतःवरही विश्वास बसत नव्हता की त्याच्या बेरंगी आयुष्यात असा काही बदल होईल ….
बेरंगीच आयुष्य म्हणावं लागेल … काही महिन्यांपूर्वी सिगारेटच्या व्यसनाच्या आधीं गेलेला हा तिशीतला तरुण ….. गुटखा, तंबाखूची सवय मित्रांमुळं लागलेली …. या तिन्ही गोष्टींचा अतिरेक ..सो कॉल्ड टेंशन घालविण्यासाठी व्हायचे तेच झालं .. तोंड येण्याचं निमित्त झालं तसं ते वारंवार यायचंच पण यावेळी बरचं होईना .
बोलताना सुध्दा त्रास व्हायला लागला (Larynx (voice box) Cancer) , जेवताना अन्न गिळताना त्रास व्हायला लागला तसंतर तोंडाला कसली चवचं नव्हती . ही लक्षणं एक वेगळ्या वाटेने त्याला घेऊन चालली होती हे त्याला कळालंच नाही . एक दिवशी आरशासमोर तोंड उघडून आत पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की, आपल्या तोंडात एक पांढरा चट्टा आहे तसा तो चट्टा दुखत वगैरे नव्हता , तरी देखील त्याच मन चरकलचं .
सिगारेटच व्यसन चालूच होतं कारण आता टेन्शनमध्ये अजुनभर पडली होती . तोंडात आलेले कोड तो पांढरा चट्टा या विषयावर तो कोणाशी काहीच बोलला नाही . त्याला तोंड उघडायला देखील त्रास होऊ लागला . कोणाशी काही बोलता नाही पण त्याचं मन आतून त्याला खात होतं की काही तरी आपल्या तोंडाच्या बाबतीत बिनसलय …
हे काहीतरी बिनसल्याची त्याला जाणीव होणं हिच खूप मोठी गोष्ट होती , करणं ही सगळी तोंडाच्या कॅन्सरची (Oral Mouth Cancer) लक्षणं होती . जी वेळीच ओळखणं गरजेचं होतं . भारतात आढळणाऱ्या कॅन्सरपैकी ‘तोंडाच्या कॅन्सर’ पहिल्या तीन क्रमांकावर येतो. मुख्यत्वे तंबाखू उत्पादनांच्या सेवनाने होणार हा कॅन्सर आपल्या भारतातील तरुण पिढीला विळख्यात घ्यायला टपलाय .
तंबाखु उत्पादनाच्या मग ते कोणत्याही प्रकारचे उत्पादन असो त्याच्या सेवनाने , धुम्रपान , गुटखा , अतिमद्यपान ही तोंडाच्या कॅन्सरची प्रमुख करणे आहेत . त्याचबरोबर मुखाची अस्वच्छता आपल्या विपरीत जीवनशैलीमुळे , मानसिक ताण या बाबीही या कॅन्सर होण्याला सहाय्य्यभुत ठरतात . भारतामध्ये या कॅन्सरचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे . परंतु वेळीच लक्षणे ओळखून प्रतिबंधात्मक उपाय व योग्य उपचाराअंती यातून बाहेर पडणं सहजशक्य आहे .
नियतीनं आपल्याही आयुष्याच्या खेळामध्ये असा कॅन्सरचा बाऊन्सर टाकलाच तर …. तसा तो ओळखताही आला पाहिजे … आणि …. तो चुकवताही आला पाहिजे …. तसा तो राहुलनेही ओळखलापण आणि चुकवलापण …. ‘ प्रोलाईफ कॅन्सर सेन्टर ‘ मध्ये स्वतःहून येऊन तपासणी करून घेतली … आणि कॅन्सरचं निदानाही झालं …पण जिद्दीनं आणि धीरानं डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य उपचारांनी मनोधैर्यान कॅन्सरवर मात केली .आज विघ्नहर्त्याचं स्वागत करताना गुलाल उधळताना बेधुंद नाचणारा राहुल … पुन्हा सज्ज झालाय आयुष्य नव्यानं जगायला ….नव्हे खेळायला … कॅन्सर बाऊन्सर चुकवून ……
डॉ. सुमित शहा