जठराचा कर्करोग:-चोर पावलांचा प्रवास
अन्ननलिकेचा पुढील भाग म्हणजे जठर. आपण खाल्लेल्या अन्नपचनाची सुरूवात येथुन होते. तसा हा महत्त्वाचा अवयव पण यालाच कर्करोग झाला तर….? हा जठराचा कर्करोग म्हणजेच पोटाचा कर्करोग यालाच Gastric cancer असेही संबोधले जाते तसं पाहिलं तर हा आजार आधी मुख्यत्वे Western countries मध्ये जास्त होता, पण आता भारतातही याचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत आहे. अमेरिकेमध्ये मृत्यूस कारणीभूत आजारांमध्ये नंबर दोनवर हा जठराचा कर्करोग (Gastric cancer) गणला जातो.जगज्जेता नेपोलियन देखिल या कर्करोगापुढे हारला. तो स्वतः त्याचे वडील, भावंड, काका या सर्वांच्या मृत्यूचे कारण हा कर्करोग होता. जठराच्या कर्करोगाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अधिकांशवेळा लक्षणाशिवाय हा वाढलेला दिसून येतो. सुरूवात अगदी हळूहळू होते सुरुवातीला काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, आणि जेव्हा उशिराने हे लक्षात येते तेव्हा तो सेकंड स्टेजमध्ये पोहोचलेला असतो.मग प्रश्न असा पडतो की, हा ओळखायचा कसा ? आम्लपित्त, पुनःपुन्हा ढेकर येणे, (Acidity). पोटदुखी भूक कमी लागणे ही सर्वसाधारणणे पोटाच्या अल्सरची लक्षणे आहेत, पण यालाच जोडून काळजाकडे जळजळ होऊ लागली, अकारण वजन घडलं, थोडसं खाल्लं तरी पोट भरल्यासारख वाटू लागल. अँनिमिया आहे, बेचैनी अस्वस्थता वाढतेय, मळमळ, उलट्या होऊ लागल्यात व उलटीमध्ये रक्त आढळले, शौचामधून काळ्या रंगाचे रक्त पडत असेल, तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करता कामानये, कारण या सर्व लक्षणांचा हळूहळू वाढत जाणारा प्रवास हा जठराच्या कर्करोगाच्या मुक्कामी जाऊन थांबतो.*
जठराचा कर्करोग कोणाला होण्याची अधिक शक्यता. . .
१) कुटूंबातील रक्तातील नात्यात पोटाचा कॅन्सर झाला असल्यास, आनुवंशिक कारणांमुळे.
२) बॅक्टेरिया एच पायोलरी या जंतूच्या दीर्घ संसर्गाने, पोटाला सूज आल्यामुळे.
३) B-१२ Vitamin ची शरीरात कमतरतेमुळे शक्यता.
४) A+ve रक्तगट व्यक्ती त्यामध्येही साधारणपणे पुरूषांना शक्यता.
५) पोटाला आतून छोट्या छोट्या छोट्या गाठी आल्या असल्यास शक्यता.
६) वयाचा विचार करता चाळिशीनंतर या संसर्गाची शक्यता.
७) वेदनाशमक औषधे, मिठ, अतिवापर.
८) मसालेदार, अतितेलकट, अतितिखट पदार्थांचे सततचे सेवन.
९) स्मोक फूड, मांसाहारी, उच्च प्रक्रिया केलेल अन्नाचा अधिक वापर.
१०) धुम्रपान, तंबाखु, दारुचे अतिसेवन.
मला हा कॅन्सर कसा टाळता येईल? (How can I prevent this cancer?)
१) दररोज व्यायाम करा, वजन नियंत्रणात ठेवा.
२) जेवणामधे कोथिंबीर, फळभाज्या, पालेभाज्या, तंतुमय पदार्थ, कच्चे सॅलड याचा आवर्जुन वापर करावा.
३) स्निग्धांश कमी न अधिक प्रोटीनयुक्त आहार असावा.
४) दुषित पाणी, दुषित अन्न टाळावे.
५) मिठाचा वापर कामी करावा, अतितेलकट, अतितिखट, मसालेदार, अन्नपदार्थ शक्यतो टाळावेत.
६) मद्यपान, धूम्रपान अतिप्रमाणात टाळावे.
७) आहारामध्ये फळांचा समावेश असावा, पाणी भरपूर प्यावे.
८) डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषधोपचार टाळावा.
९) नेहमीच वेदनाशामक औषधे टाळावे.
१०) नियमित वैद्यकीय तपासणी तदयाकरची करून घ्यावी.
जठराच्या कर्करोगाचे उपचार (Gastric Cancer Treatment in Marathi)
यावरील उपचार हा आजार कुठल्या स्टेजमध्ये आहे ? पोटातील गाठ किती मोठी आहे ? किती खोलवर गेलेली आहे ? तसेच हा आजार इतर अवयवांना पसरलाय का ? यांवर उपचारांची दिशा ठरते.
प्राथमिक उपचार प्रक्रियेमध्ये एंडोस्कोपी, बायोप्सी, सोनोग्राफी, सी .टी. स्कॅन या तपासण्या व इतर आवश्यकतेनुसार सर्जरी, केमोथेरपी, रेडिएशन, टार्गेटेड ड्रग थेरपीचा वापर केला जातो पण हा उपचार तज्ञ्यांकडून केल्यास यशाची शक्यता वाढते हे मात्र नक्की.
जर तुम्हाला जठराच्या कर्करोगाचे (Stomach Cancer) निदान करायचे असती तर त्वरित संपर्क साधा Dr. Sumit Shah. यांचेशी Prolife Cancer Centre येथे संपर्क करा.