तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) हा एक गंभीर आजार आहे, परंतु या आजाराचे जर वेळेमध्ये वेळेत निदान झाले योग्य उपचार घेतले तर तो बरा होऊ शकतो. तोंडाचा कॅन्सर मुख्यतः तोंडाच्या विविध भागांमध्ये होतो, जसे की ओठ, जीभ, गाल, तोंडाचा इतर काही भाग आणि घसा. हा कॅन्सर बहुधा तंबाखू, गुटखा, दारू सेवन आणि इतर काही घटकांमुळे होतो. तोंडाचा कॅन्सर साधारणपणे वेगाने पसरतो, परंतु योग्य आणि वेळेवर उपचार केल्यास तो नियंत्रित करता येतो किंवा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
तोंडाचा कॅन्सर होण्याची कारणे कोणती आहेत ? (What are the Causes of Oral Cancer?)
1. तंबाखू आणि गुटखा सेवन: तंबाखू आणि गुटखा सेवन करणे हे सर्वात सामान्य कारण आहे. तंबाखूचे सेवन तोंडाच्या ऊतींवर प्रतिकूल असा प्रभाव टाकते, ज्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
2. दारूचे अतिसेवन: तंबाखू प्रमाणेच दारूचे सेवन करणाऱ्यांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचा धोका अधिक असतो.
3. एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमाव्हायरस): एचपीव्ही व्हायरसचा संक्रमणही तोंडाच्या कॅन्सरचे कारण ठरू शकतो.
4. अनुवांशिकता: काही वेळा कुटुंबामध्ये कॅन्सरचा इतिहास असल्याने देखील तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो.
तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे कोणती आहेत ?
तोंडाचा कॅन्सर वेळेमध्ये ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. प्रारंभिक अवस्थेतील काही लक्षणे पुढील प्रमाणे असू शकतात:
1. तोंडात जखम: तोंडामध्ये जखम होणे आणि ही जखम 2-3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी न होणे.
2. तोंडात किंवा जीभेवर गाठी: तोंडात किंवा जिभेवर गाठ येणे आणि ही गाठ मोठी होताना वेदना जाणवू शकतात.
3. तोंडात रक्तस्त्राव किंवा वेदना: तोंडामध्ये रक्तस्राव किंवा वेदना होणे,हे देखील एक महत्त्वाचे लक्षण असू शकते.
4. तोंडात किंवा घशात वेदना: तोंडामध्ये किंवा घशामध्ये सतत वेदना होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
5. खोकला आणि गिळण्यास त्रास: कॅन्सर झाल्यावर गिळण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे जेवण घेणे सुद्धा कठीण होते.
6. अस्पष्ट रित्या वजनकमी होणे : अचानकपणे वजन कमी होणे हे सुद्धा लक्षण असू शकते.
7. गिळताना त्रास होणे.
तोंडाच्या कॅन्सरचे निदान कसे होते?
- तोंडाच्या कॅन्सरचे निदान साधारणपणे बायोप्सीद्वारे होते.
- डॉक्टर्स प्रभावित क्षेत्रातून काही ऊती घेऊन त्यांची चाचणी करतात.
- याशिवाय सीटी (CT किंवा CAT) स्कॅन, एमआरआय किंवा पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी – पीईटी स्कॅनद्वारेही तपासणी होते.
तोंडाच्या कॅन्सरवर उपचार:
तोंडाच्या कॅन्सरचा उपचार त्याच्या अवस्थेवर आणि पसरलेल्या प्रमाणावर अवलंबून असतो. उपचारांचे काही प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
1. शस्त्रक्रिया (Surgery): सामान्यतः सुरुवातीच्या टप्प्यात कॅन्सर झालेल्या ऊती काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली जाते.
2. किमोथेरपी (Chemotherapy): किमोथेरपीमध्ये औषधांच्या माध्यमातून कॅन्सरच्या पेशींना नष्ट केले जाऊ शकते.
3. रेडिएशन थेरपी (Radiation Therapy): तोंडाच्या कॅन्सरमध्ये रेडिएशन थेरपीचा वापर करुन कॅन्सर पेशींना नष्ट केले जाऊ शकते.
4. इम्यूनोथेरपी (Immunotherapy): ही थेरपी रुग्णाच्या प्रतिकारशक्तीला मजबूत करुन कॅन्सर पेशींना लढण्यास मदत करते.
5. टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy): या उपचार पद्धतीमध्ये कॅन्सर पेशींवरील विशिष्ट अणूंना लक्ष्य केले जाते.
तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव कसा कराल ? (How to Prevent Oral Cancer?)
तोंडाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी काही गोष्टींचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ते पुढील प्रमाणे :
1. तंबाखू आणि गुटखा खाणे टाळा: तंबाखू आणि गुटख्याचे सेवन पूर्णपणे सोडावे.
2. दारूचे सेवन करणे टाळा : दारूच्या अतिसेवनामुळे सुद्धा तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो त्यामुळे दारूचे सेवन करणे टाळा.
3. तोंडाची व्यवस्थित स्वच्छता राखा: तोंडाची नियमित स्वच्छता करा आणि कोणतीही जखम किंवा तोंडातील अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करू नका.
4. वर्षातून किमान एकदा तोंडाची तपासणी करा: तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. नियमित दंत तपासणी करणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
5.एचपीव्ही संसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण करून घेऊ शकता.
6. योग्य आहार आणि व्यायाम : योग्य आहार घेणे आणि व्यायाम करणे आवश्यक आहे, चुकीचा आहार खाण्यामध्ये गेल्याने सुद्धा तोंडाच्या समस्या जाणवू शकतात.
7. जास्त UV संपर्क टाळा – योग्य सन स्क्रीन लोशन वापरू शकता.
तोंडाचा कॅन्सर कॅन्सर बरा होतो का? (Is Oral Cancer Curable?)
तोंडाच्या कॅन्सरचे यशस्वी उपचार करण्याचे प्रमाण कॅन्सरच्या अवस्थेवर अवलंबून असते. जर कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यात शोधला गेला असेल तर शस्त्रक्रिया आणि रेडिएशन थेरपीद्वारे तो कॅन्सर यशस्वीरित्या बरा करण्याची शक्यता खूपच जास्त असते. परंतु जर कॅन्सर वेगाने पसरला असेल तर उपचार अधिक आव्हानात्मक ठरू शकतात.
तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer) बरा होऊ शकतो, पण यावर उपचार करण्याची संधी कॅन्सरच्या स्टेजवर आणि पेशंटच्या एकूण तब्येतीवर अवलंबून असते. जर तोंडाचा कॅन्सर लवकर ( प्रारंभिक स्टेजवर ) ओळखला गेला, तर योग्य उपचार करून तो पूर्णपणे बरा होण्याची शक्यता असते. उपचारामध्ये सुद्धा विविध पद्धती उपलब्ध आहेत.
तोंडाच्या कॅन्सर साठी करण्यात येणारी उपचार यशस्वी होण्यासाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :
1. तोंडाच्या कॅन्सरचे लवकर निदान होणे महत्त्वाचे आहे. तोंडात गाठ, जखम, किंवा अनियमितपणे खूप दिवस टिकणारे दुखणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2. आहार आणि जीवनशैलीत बदल – तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि अल्कोहोल टाळणे.
3. रेग्युलर फॉलो-अप – उपचारादरम्यान आणि उपचारानंतर डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, कारण कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता असते.
कॅन्सरची स्टेज, प्रकार, आणि पेशंटची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टर उपचाराचे योग्य मार्गदर्शन देऊ शकतात.तोंडाच्या कॅन्सरचा उपचार सुरू असताना मानसिक स्थिती ठाम आणि उत्तम असणे खूप गरजेचे आहे. मनोबल वाढवण्यासाठी आणि आत्मविश्वास टिकवण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचे सहकार्य खूप मोलाचे असते. योग्य आहार, व्यायाम आणि सकारात्मक दृष्टीकोन हा कॅन्सरविरुद्धच्या लढाईत खूप महत्त्वाचा भाग आहे.
तोंडाचा कॅन्सर वेळेत ओळखला गेला आणि योग्य उपचार केले, तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तंबाखू, गुटखा आणि दारूचे सेवन टाळणे आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे हे तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव करण्याचे मुख्य उपाय आहेत. योग्य उपचार, मनोबल, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन या गोष्टी कॅन्सरवर मात करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरतात.
जर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे काही लक्षणे जाणवत असल्यास किंवा तोंडाच्या काही समस्या असल्यास तुमच्या स्थानिक डॉक्टरांशी किंवा प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इंस्टीट्यूट यांच्याशी संपर्क साधू शकता. https://www.prolifecancercentre.co.in/ ही त्यांची अधिकृत वेबसाइट आहे.