मौखिक कर्करोग (Oral Cancer)
मौखिक कर्करोग (Oral Cancer) हा कार्सीनोमा(Carcinoma) प्रकारचा कर्करोग आहे. हा कर्करोग जीभ, ओठ, हिरड्या, टाळू, किंवा गालांच्या आतील बाजूस होतो. बऱ्याचदा तो गाल आणि हिरड्यांमध्ये(Gums) दिसून येतो. जेव्हा शरीरातील अनुवांशिक बदलामुळे पेशी नियंत्रणशिवाय जास्त वाढतात तेव्हा हा कर्करोग होतो. या पेशी जसजशा वाढतात तसतसे ते एक ट्यूमर तयार करतात. कालांतराने या पेशी शरीराच्या इतर भागातही पसरतात.
मौखिक कर्करोग (Oral Cancer)प्रमुख कारण आहे.
मौखिक कर्करोग लक्षणें (Symptoms of Oral Cancer)-
- तोंडाच्या किंवा जिभेच्या अस्तरावर डाग
- तोंडात फोड येणे
- हिरड्या मोठ्या किंवा जाड होणे
- दात सैल पडणे
- तोंडातून रक्त येणे
- कानात वेदना होणे
- जबड्यात सूज येणे
- घसा खवखवणे(Sore Throat)
- गिळण्यात(swallowing) किंवा चगळण्यात(Chewing) अडचण येणे
- तोंड न उघडणे
- तोंडात लाल डाग दिसणे
- गळ्यात गाठ जाणवणे
- तोंडात सफेदपणा येणे
- वजन कमी होणे
- मानेजवळ गाठ असणे
- आवाजाचा कर्कशपणा
अशी बरीच लक्षणें आहेत मौखिक कर्करोगा (Oral Cancer). वेळीच उपचार केल्यास तोंडाचा कर्करोग(Mouth Cancer) पूर्ण बरा होऊ शकतो. वयाच्या 40 नंतर हा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. आनुवंशिकतेमुळेही तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.
तोंडाच्या कर्करोगाचा(Mouth Cancer) उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठीचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. सर्जरी, केमोथेरपीद्वारे या कर्करोगावर उपचार केला जातो.
कॅन्सर जर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेज मध्ये असेल तर शस्त्रक्रिया करून कॅन्सर काढून टाकला जातो. मानेमध्ये गाठी असतील तर त्याही काढून टाकल्या जातात. यामध्ये रुग्णांच्या जीभ, जबडे, गाल या अवयवांची झालेली हानी आधुनिक पद्धतीने प्लास्टिक सर्जनच्या मदतीने इतर अवयवांचा वापर करून भरून काढली जाते. तिसऱ्या स्टेजमधील कॅन्सर साठी ऑपेरेशन नंतर रेडीएशन ची गरज भासते. रेडीएशन च्या माध्यमातून आजार परत येण्याची शक्यता कमी करता येते.
कॅन्सर च्या चौथ्या स्टेज मध्ये केमोथेरपीचा उपचार केला जातो. या स्टेज मध्ये मात्र रुग्णाचे आयुष्य कसे वाढवता येईल याचाच विचार करावा लागतो.
काही गोष्टींची काळजी घेतली तर हा कर्करोग टाळता येऊ शकतो, जसे की धूम्रपान व मद्यपान न करणे, दात आणि तोंड नियमितपणे स्वच्छ करणे. तोंडामध्ये काही बदल दिसला तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे. प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट मध्ये याचे अचूक निदान आणि उपचार होतात.
डॉ. सुमित शाह
डॉ. सुमित शाह प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट (Prolife Cancer Center and Research Institute) संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन(Surgical Oncology and Laproscopic Surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे.डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेले आहेत.