कर्करोगाचे निदान आपल्याला झाले की आपण सर्वजण घाबरुन जातो. आपल्या सर्वांच्या डोक्यात व मनात कर्करोग म्हणजे मृत्यु अटळ असतो. हे पक्के बसलेले आहे. अर्थात कर्करोगाची भीषणता आपण सगळेच जाणतो. जगभरात कर्करोगाने हजारो माणसं रोज मृत्यूमुखी पडतात. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत त्यात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण खुप जास्त आहे. आणि कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण स्तनाचा कर्करोग(Breast Cancer) पुरुष व स्त्री दोघांनाही होऊ शकतो. त्यामुळे योग्य तू खबरदारी घेणे योग्य ठरते. सध्या भारतात स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढु लागले आहे. स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे(Breast Cancer) प्रमाण 33 टक्के इतके आहे. दर ३० स्त्रियांमध्ये एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग(Breast Cancer) होण्याची शक्यता असते. स्तनाच्या कर्करोगाची अनेक कारणे आहेत.
स्तनाच्या कर्करोगाची कारणे
स्तनाचा कर्करोग अनुवंशिकतेमुळे होतो. आईला किंवा आजीला स्तनाचा कॅन्सर असेल तर ते जीन्स पुढच्या पिढीत येण्याची शक्यता जास्त असते.
- स्त्रीला वयाच्या ५५ वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास
- दारु व सिगरेट ह्या गोष्टींचे व्यसन असणाऱ्या स्त्रियांना
- जास्त वजन असलेल्या स्त्रिया
- अधिक चरबीयुक्त, तेलकट आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांना
- मुलं नसलेल्या स्त्रियांना
- ज्या स्त्रियांची मासिक पाळी लवकर चालू होऊन उशीर वयात संपली
- ज्या स्त्रियांनी बाळास अंगावरचे दूध पाजले नाही
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे
स्तनाच्या कर्करोगाचे(Breast Cancer) निदान लवकर, म्हणजे पहिल्याच स्टेज मध्ये झाल्यास तो बरा होऊ शकतो. तसेच त्यासाठी लागणारे औषधोपचाराचा खर्च कमी व वेळही कमी लागतो. खालील काही लक्षणे समजून घ्या.
- स्तनाचा आकार व रंग बदलणे
- स्तन लाल होणे, त्यावर सुज किंवा व्रण असणे
- स्तनाग्रांची(निपलची) जागा बदलली जाणे
- निपल आतल्या बाजूला जाणे
- निपलमधुन पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येणे
- स्तनावर फोड किंवा पुरळ येणे
- एक स्तन दुसऱ्यापेक्षा आकाराने लहान होणे
- स्तनांमध्ये सतत दुखणे
स्तनाचा कर्करोग होऊ नये म्हणून खालील काळजी घेणे
स्त्रियांनी मासिक पाळी संपल्यावर पाचव्या, सहाव्या दिवशी स्तनाच्या वर, खाली, उजव्या व डाव्या बाजूला हात फिरवून पाहावे कुठे गाठ जाणवते का ते तपासणे. हाताच्या बोटाने काखेत व स्तनाच्या सर्व भागात दाबुन बघावे. कर्करोगाची गाठ हाताला कडक लागते. ४० शी नंतर मॅमोग्राफी करून घेणे. स्त्रीने तिला बाळ झाल्यावर त्याला नियमीत स्तनपान करावे. गर्भनिरोधक गोळ्यांचा जास्त वापर करु नये. मध्यपान व सिगरेट व्यसन करु नये.
स्त्रीने आपली पाळी गेल्यावर वजन वाढु देऊ नये. ह्या सर्व गोष्टींचे पालन स्त्रियांनी केले तर त्यांना स्तनाचा कर्करोग(Breast Cancer) होण्याची शक्यता कमी असते. तसेच योग्य वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कारण प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते.