स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळणारा कर्करोग म्हणजे स्तनाचा कर्करोग. स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) झाल्यास स्तनाच्या पेशींमध्ये अनियंत्रितपणे वाढ होते, स्तनाचा कर्करोग हा वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो परंतु शरीरामधील काही हार्मोनच्या प्रभावामुळे स्तन कर्करोगाच्या विकासामध्ये हातभार लागू शकतो. हार्मोन थेरपी (Hormone Therapy) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. हार्मोन थेरपीचा उपयोग करून कर्करोगाच्या वाढीला नियंत्रित करता येऊ शकते. आजच्या ब्लॉग मध्ये स्तन कर्करोगासाठी हार्मोन थेरपी कशा प्रकारे कार्य करते तसेच हार्मोन थेरपीचे फायदे आणि दुष्परिणाम आणि इतर माहिती जाणून घेणार आहोत.
हार्मोन थेरपी म्हणजे काय ? – What is hormone therapy ?
स्तनाच्या काही प्रकारच्या कर्करोगांचा विकास हा हार्मोन्सच्या प्रभावामुळे होतो आणि कर्करोगाच्या वाढीसाठी कारणीभूत असलेले हार्मोन जसे की एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन थेरपी मध्ये अवरोधित केले जातात, असे केल्यामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीस मंद केले जाऊ शकते.
हार्मोन थेरपी कोणाला दिली जाऊ शकते ? – Who is suitable for hormone therapy?
१ . ज्या रुग्णांचा कर्करोग हा हार्मोन प्रेरित असतो त्या रुग्णांना हार्मोन थेरपी दिली जाऊ शकते.या प्रकारचा कर्करोग हा मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांमध्ये आढळून येतो आणि यामध्ये शरीरातील एस्ट्रोजन तसेच प्रोजेस्टेरॉन हार्मोन्सचा प्रभाव हा महत्त्वाचा ठरतो.
२. कर्करोगाच्या पेशीच्या वाढीला हार्मोन थेरपी केल्यामुळे रोखता येऊ शकते.
३. स्तनाचा कर्करोग ट्यूमर एच आर पॉझिटिव्ह असल्यास त्यासाठी हार्मोन थेरपी वापरली जाते जर स्तनाचा कर्करोग ट्युमर हा एच आर निगेटिव्ह असेल तर अशावेळी इतर उपचारांची शिफारस डॉक्टरांमार्फत केली जाऊ शकते.
४.रजोनिवृत्ती पूर्वी किंवा रजो निवृत्तीनंतरच्या एच आर पॉझिटिव्ह स्तनाच्या कर्करोगाकरिता कोणत्याही टप्प्यामध्ये डॉक्टर हार्मोन थेरपी घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
हार्मोन थेरपी कशाप्रकारे कार्य करते ? – How does hormone therapy work?
विविध प्रकारची संप्रेरक आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात आणि हे संप्रेरक विशिष्ट पेशी कसे कार्य करतात यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये मदत करतात. स्त्रियांच्या अंडाशयामध्ये रजोनिवृत्ती पूर्वी प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन तयार होत असतात. तसेच हे संप्रेरक इतर उत्तकांमध्ये सुद्धा तयार होतात आणि म्हणूनच रजनी निवृत्तीनंतर महिला तसेच पुरुषांमध्ये काही प्रमाणामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आढळून येतात. हे हार्मोन्स काही स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीसाठी प्रोत्साहन देण्याची शक्यता असते.
हार्मोन थेरपी चांगले उपचार पद्धती मानली जाते कारण ती संपूर्ण शरीरामधील हार्मोन्सला लक्ष करतात. प्रत्येक हार्मोन थेरपी प्रकाराच्या स्वतःची अशी क्रिया यंत्रणा असते. हार्मोन थेरपी ही कर्करोगाची वाढ थांबवण्यामध्ये तसेच मंद करण्यामध्ये मदत करते त्याचप्रमाणे कर्करोगाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुद्धा हार्मोन थेरपी मदत करू शकतो.
हार्मोनल थेरपी फायदे – Hormonal Therapy Benefits:
हार्मोन थेरेपीचा मुख्य उद्देश हा कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवणे किंवा मंद करणे असून हार्मोन थेरपीचे फायदे पुढील प्रमाणे आहेत :
१. हार्मोन थेरपी मुळे कर्करोगाची पुनरावृत्ती होणे टाळू शकते. हार्मोन थेरपी कर्करोगाच्या पेशींच्या विकासास प्रतिबंध करते आणि म्हणून कर्करोगाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता ही कमी होते.
२. ज्या रुग्णांमध्ये सर्जरी किंवा किमोथेरपी यांसारखे उपचार करणे शक्य नसते अशा रुग्णांसाठी हार्मोन थेरपी हा एक प्रभावी असा उपाय ठरू शकतो.
३. हार्मोन थेरपीमुळे झोप चांगल्या प्रकारे येऊ शकते.
४. मेनोपोजनंतरच्या महिलांमध्ये हार्मोन थेरपी मुळे उत्साह तसेच आनंद टिकून राहण्यामध्ये मदत होते.
५. रजोनिवृत्तीनंतर हाडे ठिसूळ होणे तसेच थकवा किंवा अंगदुखी यांसारख्या समस्या जाणवू शकतात त्यासाठी सुद्धा हार्मोन थेरपी महत्त्वाची ठरू शकते.
६. हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी हार्मोन थेरपी महत्त्वपूर्ण ठरते.
हार्मोन थेरपीचे दुष्परिणाम – Side effects of hormone therapy:
हार्मोन थेरपी ही फायदेशीर असली तरी सुद्धा हार्मोन थेरेपीचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत, ते पुढील प्रमाणे :
१. डोकेदुखीच्या समस्या जाणवू शकतात.
२. मळमळ होऊ शकते.
३. थकवा जाणवू शकतो.
४. भूक न लागणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात.
५. हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये वेदना जाणवू शकतात.
६. रक्तामधील कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते.
७. मूड स्विंग होऊ शकतात.
८. हॉट फ्लशिंग होऊ शकते.
९. वजायनल डिस्चार्ज
१०. केस गळतीची समस्या जाणवू शकते.
११. डायजेस्टिव्ह सिस्टिम प्रॉब्लेम येऊ शकतात.
१२. वजन वाढू शकते.
हार्मोन थेरेपीचा कालावधी किती असू शकतो ? – What is the duration of hormone therapy?
हार्मोन थेरपीचा कालावधी हा रुग्णाच्या कर्करोगाच्या परिस्थितीवर अवलंबून असतो परंतु साधारणतः हा कालावधी दोन वर्ष ते दहा वर्षापर्यंत असू शकतो.
ज्यावेळी स्तनांचा कर्करोग हा हार्मोन क्रेडिट असतो अशावेळी हार्मोन थेरपी ही स्तनाच्या कर्करोगासाठी प्रभावी उपचार ठरू शकते. हार्मोन थेरपीचे विविध फायदे आहेत त्यासोबतच दुष्परिणाम सुद्धा आहेत म्हणूनच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नक्कीच डॉक्टरांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे असते. रुग्णाच्या स्तनाच्या कर्करोगाची परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टर त्यावर योग्य ते उपचार आणि थेरपी देण्याचा निर्णय घेतात. स्तनाचा कर्करोग असेल किंवा इतर कुठलाही कर्करोग असेल तरीसुद्धा कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वच माहिती ही वैद्यकीय सल्ल्याच्या आधारावरच घेतली गेली पाहिजे.
स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आणि जास्त प्रमाणात आढळणारा कर्करोग आहे, परंतु हार्मोन थेरपी त्यावर प्रभावी उपचार ठरू शकते. हे उपचार कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला मंद करू शकतात आणि कर्करोगाची पुनरावृत्ती टाळू शकतात. तथापि, हार्मोन थेरपीच्या दुष्परिणामांची शक्यता देखील आहे, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या उपचारांचा निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रत्येक रुग्णाच्या कर्करोगाची परिस्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे त्यावर आधारित योग्य उपचार आणि थेरपी दिली जातात. कर्करोगाच्या उपचारांची माहिती घेण्याआधी सर्व वेळ वैद्यकीय सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
जर तुम्ही स्तन कर्करोगासाठी हार्मोन थेरपी घेण्याचा विचार करत असाल, तर Prolife Cancer Centre हे पुण्यातील एक उत्कृष्ट कर्करोग रुग्णालय आहे. येथे अनुभवी कर्करोग तज्ञांकडून कस्टमाइज्ड हार्मोन थेरपी उपचार मिळवू शकता, जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि उपचार देईल. Prolife Cancer Centre मध्ये रुग्णांच्या गरजा लक्षात घेतल्या जातात आणि ते सर्वसामान्य व सखोल उपचार प्रदान करतात, जे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकतात.
Contact Prolife Cancer Centre today to explore hormone therapy options for breast cancer and start your treatment with trusted specialists at one of the best cancer hospitals in Pune.