कॅन्सर हा शब्द उच्चारता क्षणी माणसाच्या मनामध्ये एक अनामिक भिती निर्माण होते.अन नानाविध प्रश्नाची मालिका सुरु होते . ती भिती अनाठायी नसतेच मुळी… का होतो? कशामुळे होतो? लक्षणे कोणती ? मला होऊ नये म्हणून मी काय करू ? अशा प्रश्न चक्रव्यूहात आपण अडकतो अन ते स्वाभाविकही आहे. अशाच स्वरूपाच्या आत्यंतिक वेगानं पसरत चाललेल्या ब्रेस्ट कॅन्सर ( स्तनाच्या कर्करोगाचा ) आढावा घेऊयात.
आज भारतामध्ये महिलांना होणाऱ्या कॅन्सरमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण ३२ % एवढं आहे.दर २२ महिलांमध्ये एका महिलेला या कॅन्सरच्या आजाराने जखडले आहे. ‘ती’ कॅन्सर पिडीत महिला आपण नसावं किंवा आपल्या परिवारातील प्रिय सदस्य नसावा असे वाटत असेल, याबाबत जागरूक असणे हे ओघाने येतेच…. जागरूक राहायचं म्हणजे नेमके काय ?
इशिता; तिशीतली वर्किंग वूमन ; काम आणि आरोग्य दोन्ही बाबत दक्ष असणारी, परंतु तिच्या डाव्या स्तनात होणारा बदल तिच्या नजरेतून सुटलाच… तिची आजी ब्रेस्ट कॅन्सरने गेली होती या ब्रेस्ट कॅन्सर ला थोडी फार अणुंवंशिकतेचीही जोड असते, या सत्याने इशिता पूर्णपणे अनभिज्ञ होती. स्नायू वेदना, पाठ दुखीचा त्रास तर नेहमीचाच ,पेन किलर गोळी ठरलेली .कदाचित कामामुळे असेन…अलीकडे वजनवाढीमुळे,लठ्ठपणाकडे झुकूत असलेल्या तब्येतीला ती कुटुंब नियोजनाच्या गोळ्यांच्या जास्त वापराचा परिणाम समजायची पण हा परिणाम ब्रेस्ट कॅन्सरकडे जाऊ शकतो हे तिला माहीतच नव्हतं . गेल्या महिन्यामध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर, तिच्या डाव्या स्तनाग्रातून काळपट द्रव्य पाझरत असल्याचे तिला लक्षात आले. परंतु पहिल्या प्रसूती नंतर फिगर मेंटेन फॅडमुळे बाळाला स्तनपान न करण्याच्या निर्णयामुळे असे प्रकार होत असतील…असा तिचा समज होता. खरतर तो समज नव्हे वस्तुस्थिती होती.
स्तनाच्या कॅन्सरच्या या दब्या आवाजातील हाका इशिता ऐकू शकत नव्हती . स्तनाच्या ठिकाणी घट्टपणा येऊन तिथे न थांबणारी खाज सुटली.. स्तनाग्र लाल होऊन त्या ठिकाणी वेदना होऊ लागल्या. डाव्या स्तनाग्राच्या खाली हाताला जाणवणारी, न दुखणारी गाठ होती. आता मात्र इशिता खडबडून जागी झाली…कॅन्सर? मला…मी तर तिशीतली , वाढत्या वयात याचा धोका असतो …खर होत तिचं. पन्नाशीनंतर होणारा हा आजार…पण अलीकडे ३० ते ३५ वयोगटातील स्त्रियांमध्ये होतोय , हे वास्तव आहे. सुरुवातीला वेदनारहीत गाठ, स्तनाच्या त्वचेत येणार कडकपणा ,स्तनाग्र आतल्याबाजूला ओढले जाणे ,स्तनाग्राला भेगा पडणे किंवा जखम होणे , काखेतील गाठी ही दुर्लक्षित करून चालत नाहीत.
व्यस्त आणि त्रस्त जीवनशैली, चरबीयुक्त आहार, व्यसनाधीनता. या जनरल गोष्टीबरबरच काहींच्या बाबतीत १२ वर्षाच्या आधीच मासिक पाळी सुरु झाली असल्यास आणि वयाच्या ५० वर्षानंतर रजेनिवृत्ती संपली असल्यास, प्रसूती नंतर स्तनपान न करणाऱ्यांना या कॅन्सरच्या लवकरच हाका ऐकू येतात… पण त्यावेळीच ओळखता यायला हव्या.
इशिताच्या बाबतीत मात्र उशीर झाला होता. कॅन्सर सेंटरमध्ये योग्य उपचार घेत इशिता पूर्णपणे बरी होणाच्या मार्गावर आहे.. पण हे इशिताला टाळता आले असते का…..? नक्कीच टाळता आले असते जर तिने या हाका जाणीवपूर्वक ऐकल्या असत्या तर… २० वर्षावरील सर्वच महिलांनी जागरूक असणे गरजेचे आहे… मासिक पाळीनंतर ७व्या दिवशी स्वस्तन परीक्षण म्हणजेच स्वतःच लक्षपूर्वक स्तनाची त्वचा, स्तनाग्रे, काखेतील भाग तपासावा.अन चाळिशीनंतर वर्षातून एकदा तज्ज्ञांकडून मॅमोग्राफी हे दक्षतेचे दोन प्रमुख मार्ग आहेत.विशीच्या पुढच्या प्रत्येक स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सरच्या (स्तनांचा कर्करोग) हाका ऐकू शकतात. तेव्हा सावधपणे व जागरूकतेने आपण या लक्षणेरुपी हाका ऐकल्या तर हा आजार आपण पहिल्या स्टेजलाच ओळखू शकतो आणि योग्य उपचारांती स्तनाच्या कर्करोगाच्या मगरमिठीत अडकवण्यापूर्वी स्वतःचा बचाव करता येऊ शकतो… म्हणूनच सावध ऐका कॅन्सरच्या हाका ..!
डॉ. सुमित शाह हे पुण्यातील सर्वोत्कृष्ट कॅन्सर सर्जन आहेत. ते प्रोलाईफ कॅन्सर सेन्टरचे संस्थापक आहेत आणि ते पुण्यात मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक कॅन्सर सर्जन आहेत. ज्यांना सर्जिकल ऑन्कोलॉजीची ही पदवी प्राप्त आहे.
आपल्याला ब्रेस्ट (स्तनाच्या) कॅन्सरविषयी काही प्रश्न असतील तर आजच भेट द्या प्रोलाईफ कॅन्सर सेन्टर येथे व जाणून घ्या डॉ. सुमित शाह यांच्याकडून
पत्ता – 387/5, न्यू टिम्बर मार्केट, पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग, ओसवाल बंधू समाज कार्यालयासमोर, सेव्हन लव्हज चौक, भवानी पेठ, पुणे, महाराष्ट्र– 411042.
आपण खालील क्रमांकावर संपर्क देखील करू शकतात –
+ 91-96 07 07 90 19
+ 91-96 07 07 90 29
020-26458161