४ फेब्रुवारी आज “जागतिक कर्करोग दिन” या दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्करोग व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध बाबींचा साकल्याने विचार करुयात. सर्वसामान्य माणसांमध्ये कॅन्सर या व्याधीबद्दलचे कमालीचे अर्थशून्य भय इतके पराकोटीला पोहोचले आहे कि कॅन्सर म्हणजे मृत्यूच असेच समिकरण बहुतांश लोकांनी त्यांच्या मनापुरते करून घेतलेले दिसुन येते. जेव्हाकी वस्तुस्थितीचा आपलं मन विचारच करत नाही. सध्याची कॅन्सरबाबतची वस्तुस्थिती यापेक्षा कितीतरी पटीने वेगळी आणि आशादायक आहे.
कॅन्सर म्हणजे खेळ संपला हा भ्रम दूर करणं गरजेचं आहे व तोच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. कॅन्सरचं निदान झालं कि आता काय करावं? हा मोठ्ठा प्रश्न आ वासून उभा राहतो काहीच सुचत नाही संपूर्ण कुटूंबच परिस्थितीच्या वारापुढे हतबल होऊन जातं अगदी हिच स्थिती कमी – अधिक प्रमाणात प्रत्येक कॅन्सर रुग्ण असणाऱ्या कुटूंबामध्ये दिसून येते. हे ओघानचं येतं… मुळात हे मलाच का ? मीच का? या प्रश्नांच्या विळख्यात अडकण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीचा स्विकार केलात तरच त्यावर मात करण्याचा विचार प्रसवतो.
कॅन्सर म्हणजे शरीराच्या पेशींमध्ये होणारा बदल याचा स्विकार करावा .हा बदल कोणाच्याही शरीरात हळूहळू किंवा अचानकपणेसुद्धा होऊ शकतो. सर्वात महत्वाचं म्हणजे कॅन्सर हा आपल्या शरीराच्या कोणत्या अवयवास होईल कधी होईल ? कसा होईल ? याचे उत्तर सध्यातरी कोणीच देऊ शकत नाही. पण आधुनिक कर्करोग उपचारप्रणाली याचे उत्तर रुग्णास जाणवणाऱ्या खूप आधीच्या लक्षणांच्या आधारावर देऊ शकते .कॅन्सर होण्याअगोदर काय लक्षण दिसतील ? किंवा शरीरात काय बदल होतील ? हे बदल हि लक्षणंच पुढे जाऊन कॅन्सरमध्ये परिवर्तीत होतात.
माझे कॅन्सरवर उपचार करणारा एक संवेदनशील माणूस म्हणून स्पष्ट आणि परखड मत असे असेल की तुम्ही जर माणूस आहात तर मानवी आरोग्याच्या अनुषंगाने प्रत्येक कॅन्सरची प्रारंभिक लक्षणे हि तुम्हाला माहित असायलाच हवीत कि जेणेकरून या लक्षणांचा प्रवास कॅन्सरचा मुक्काम गाठण्याआधीच योग्य उपचाराने त्यास प्रतिबंध करता येईल.*एक कॅन्सर सर्जन म्हणून कॅन्सरच्या बाबतीत प्रारंभिक
लक्षणांकडे केले जाणारे अक्षम्य दुर्लक्ष हेच सर्वात मोठ्ठे दुःख आहे .समजा एखादया व्यक्तीला कॅन्सर झालाच तरीदेखीत हतबल न होता धिरोदत्तपणे… सकारात्मकतेने या आलेल्या संकटांशी दोन हात करण्याचं बळ त्या पेशंटला मिळते…. आधारातून आणि रुग्णाच्या व कुटूंबाच्या सकारात्मकतेतून – सकारात्मकतेची सुरुवात अर्थातच परिस्थितीच्या स्विकारातूनच होते.
दूर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर योग्यवेळी, योग्य ठिकाणी योग्य उपचार लाभल्यास कर्करोगावर विजय मिळविलेल्यांची संख्या
लक्षणिय आहे. योग्य आहार-विहार व व्यायाम या गोष्टींच्या माध्यमातून सतर्कतेने आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करून आपण बहुतांश कॅन्सर प्रकारांस आपणाकडे येण्यापासून प्रतिबंध करु शकतो .फक्त यासाठी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची व स्वतःच्या जीवनशैलीबाबतच्या जागरुकतेची….!
सध्याचा कोरोनाकाळ पाहता कॅन्सरसारखी सहव्याधी असलेल्या अनेक रुग्णांना उपचारासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलला जायचे म्हटले तरी संपर्कातुन कोरोना होण्याची भिती सतत सतावत असते. आधीच कॅन्सर ….वरून आणखी कोरोनाचा आहेर नको अशी मानसिकता होतेय व हे अगदी १००% खरे आहे . रुग्णांच्या या मनस्थितीचा विचार व All only about cancer under one roof या उद्देशाने Prolife Cancer Centre & Research institute स्थापन केले आहे.
मुळात कॅन्सर होऊच नये आणि झालाच तरी तो प्रवास आयुष्याच्या दिशेने असावा हाच यामागचा हेतु आहे. आपणांस Cancer च्या बाबतीत काही जरी शंका असतील, लक्षणे दिसत असतील किंवा Cancer चे निदान झाले असले तरीही आपणांस Towards life हे ब्रिद प्राणस्वर असणारी ही संस्था आपली मित्रच ठरेल याची खात्री तुम्हाला एकवेळ भेट दिल्याशिवाय होणार नाही.
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा: