तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer)…. कर्करोग (Cancer) म्हटलं की सर्वसामान्य माणसाचं धैर्य पुर्णतः खचून जातं … व तो सगळं संपलं या निरर्थक
विचारांच्या अधिन होतो . कॅन्सर …. मग तो कुठलाही असो …. त्याचं वेळीच निदान झालं अन त्यावर योग्य ठिकाणी
यथायोग्य उपचार झाले तर इतर व्याधींसारखचं यावर देखील आपण विजय मिळवू शकतो . गरज असते ती एका ….स्विकाराची आणि निर्णयाची ….
भारतात होणाऱ्या एकूण कॅन्सरच्या प्रकारांपैकी तोंडाच्या कर्करोगाचे हे प्रमाण एक तृतीयांश टक्के आहे. दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये ७५००० मृत्यू या कर्करोगामुळे होतात . धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तरुण लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे.
Oral Cancer Causes in Marathi – तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने ओठ ,जीभ ,हिरड्या,गालाच्या आतील बाजूस होतो किंवा तोंडात कोठेही जखम ,गाठ असेल तर याची हि सुरुवात समजावी. गुटखा ,सिगारेट व तस्यम पदार्थामधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
Oral Cancer Symptoms in Marathi – वरचेवर तोंड येणे ,घशात जळजळ होणे , आवाज बसणे व पाणी गिळण्यासही त्रास होणे , ओठ बधीर होणे, दात अचानक सैल होणे , जबड्यांची हालचाल करताना त्रास होणे हि लक्षणे बरेच दिवस बरी न होणे , कधीकधी तोंड उघडणंही कठीण होऊन जाते ही खरंतर तोंडाच्या कॅन्सरची सुरुवातच असते. यालाच वैद्यकीय भाषेत ओरल सबम्युकस फायब्रासिस म्हटलं जातं . गुटखा तंबाखू सेवन करणाऱ्यांनी कॅन्सरच्या इशारा देणाऱ्या तोंडातील लाल (ERYTHROPLAKIA ) अथवा पांढरे डाग (LEUCOPLAKIA ) याकडे सोबतच फोडांकडे दुर्लक्ष करू नये . अशावेळी जागरूकतेने योग्य निर्णय घेऊन निदान कऱण्यासाठी तज्ञांच्या सल्ला घेणं अतिशय महत्वाचं ठरतं . या निर्णयाला उशीर म्हणजे परिस्थिती हाताबाहेर घालवणचं ठरतं .
लक्षणांच्या आधारे प्राथमिक स्तरावर बायोस्पी (Biopsy) व इतर चाचण्यांच्या माध्यमातून तोंडाच्या कॅन्सरचे निदान निश्चित केले जाते. निदान पक्के झाल्यानंतर सि टी स्कॅन (CT Scan) किंवा एमरयच्या (MRI ) माध्यमातून कर्करोगाची व्याप्ती(स्टेज) किती आहे , त्याचा आकार किती आहे यांची निश्चिती होते.
कुठल्याही कर्करोगाच्या उपचारामध्ये , कर्करोग पूर्णपणे काढून टाकणे , ज्या अवयवाचा भाग काढला जातो त्याचे कार्य जतन करणे किंवा तो अवयव नव्याने बनवणे , तसेच हे करताना तो भाग दिसण्यास हि व्यवस्थित असणे महत्वाचे असते. तोंडाच्या कर्करोगामध्ये हे जास्त महत्वाचे असते कारण चेहरा हा प्रामुख्याने दिसन्याचा भाग आहे तसेच ऑपरेशन नंतर रुग्णाच्या खाण्यापिण्यात , गिळण्यात व बोलण्यात काहीही फरक पडता कामा नये याची काळजी घेणे महत्वाचे असते.
Oral Cancer Treatment in Marathi – कॅन्सर जर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर सामान्यपणे शस्त्रक्रिया (Surgery) करून कॅन्सर काढून टाकण्याला प्राधान्य दिले जाते . मानेमध्ये गाठी असतील तर त्याही काढून टाकल्या जातात . यामध्ये रुग्णांच्या जीभ ,जबडे ,गाल या अवयांची झालेली हानी आधुनिक पद्धतीने ( RECONSTRUCTION ) प्लास्टिक सर्जनच्या मदतीने इतर अवयवांचावापर करून भरून काढली जाते . या मध्ये मनगटावरील त्वचा व नाडीच्या रक्तवाहिन्यांपासून नवीन जीभ किंवा गाल बनवणे , पायातील पिंढारीच्या हाडापासून नवीन जबडा बनवणे तसेच त्यावर दांत रोपंण करणे संभव आहे. यालाच ऑन्कॉप्लास्टिक सर्जरी (Oncoplastic Surgery)म्हणतात. चेहरा कुठल्याही परिस्थितीत विद्रुप होणार नाही किंवा या कर्करोगाचा परिणाम जाणवणार नाही हि देखील काळजी घेतली जाते .
तिसऱ्या स्टेजमधील कॅन्सरमध्ये ऑपेरेशन नंतर रेडिएशन ची गरज भासते. रेडिएशनच्या माध्यमातून आजार परत येण्याची शक्यता कमी करता येते. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये CHEMOTHEROPY चा उपचार दिला जातो या स्टेजला मात्र रुग्णाचे आयुष्य कसे वाढवता येईल याचाच विचार करावा लागतो . शेवटी आजाराची व्याप्ती व खोली यावरच उपचारांचे भवितव्य अवलंबून असते. यास्तव वेळीच जागे होऊन वर नमूद केलेली तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे आपल्याला थोड्याफार प्रमाणात जरी जाणवत असतील तर जराही वेळ न दवडता सजगतेने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा … हे मात्र नक्की …. !
जर तुम्हाला तोंडाच्या कॅन्सर (Oral Cancer) चे निदान करायचे असती तर त्वरित संपर्क साधा Dr. Sumit Shah. यांचेशी Prolife Cancer Centre येथे संपर्क करा.