तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडाच्या कोणत्याही एका भागात ट्यूमर विकसित होणे. हा कर्करोग जिभेच्या पृष्ठभागावर, जिभेच्या खाली , गालांच्या आतील बाजूस, तोंडाच्या छतावर (तालू), ओठ किंवा हिरड्या यापैकी कोणत्याही भागात होऊ शकतो. भारतामध्ये तोंडाच्या कर्करोग हा टॉप ३ कर्करोगापैकी एक आहे ज्यामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका दुप्पट असतो. तसेच 50 पेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना याचा सर्वात मोठा धोका असतो.
तोंडाच्या कर्करोगाची कारणे (Mouth Cancer Reasons in Marathi) खालीलप्रमाणे आहेत :
1. वय
तोंडाचा कर्करोग वाढण्यास अनेक वर्षे लागू शकतात. बर्याच लोकांना 55 वर्षांनंतर हे आढळते. परंतु अधिक तरुण पुरुषांना एचपीव्हीशी संबंधित कर्करोग होत असल्याचे आढळून आले आहे .
2. लिंग
स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता किमान दुप्पट असते. याचे कारण असे की पुरुष महिलांपेक्षा जास्त मद्यपान करतात आणि धूम्रपान करतात.
3. कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास
जर कुटुंबामध्ये कोणाला आधी कर्करोग झालेला असेल तर त्या व्यक्तीचा तोंडाचा कर्करोग होण्याचा धोखा वाढतो .
4. तंबाखू
धुम्रपान. सिगारेट, सिगार किंवा पाईप धूम्रपान करणार्यांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता धूम्रपान न करणार्यांपेक्षा सहा पटीने जास्त असते. तंबाखूतील रसायनांमुळे तोंडाच्या पोकळीतील पेशींमध्ये अनुवांशिक बदल होतात ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तसेच तंबाखूच्या नियमित सेवनामुळे यकृताचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग आणि अन्ननलिकेचा कर्करोग यांसारख्या इतर कर्करोगाचा धोकादेखील वाढवू शकतात.
5. सुपारी
सुपारीचा कॉफीसारखाच उत्तेजक प्रभाव असतो. त्यांच्यात कार्सिनोजेनिक प्रभाव देखील असतो, याचा अर्थ ते तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. तंबाखूसोबत सुपारी चघळल्याने हा धोका आणखी वाढतो.
6. आहार
अस्वास्थ्यकर आहारामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे भरपूर फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा जेणेकरून हा धोका टाळता येऊ शकतो .
7 . मानवी पॅपिलोमाव्हायरस (HPV)
मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) हा विषाणूंचा एक समूह आहे जो शरीरातील त्वचा आणि ओलसर पडद्यावर जसे की गर्भाशय ग्रीवा, गुद्द्वार, तोंड आणि घसा परिणाम करतो. आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी लैंगिक संपर्क साधून तुम्हाला HPV चा संसर्ग होऊ शकतो. HPV मुळे तोंडाच्या आत ऊतींची असामान्य वाढ होऊ शकते, ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.
8. मौखिक आरोग्य
कर्करोगाचा संबंध काहीवेळा दीर्घकालिन जखमांशी असू शकत। तुटलेले दात किंवा जिभेवर सतत व्रण किंवा जखमा होऊन तेथे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे तुमचे तोंड आणि दात निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करणे फार महत्वाचे आहे.
9. दारूचे अतिसेवन
मद्यपान न करणार्यांपेक्षा तोंडाचा कर्करोग मद्यपान करणार्यांमध्ये सहा पटीने जास्त आढळतो. अल्कोहोल आणि तंबाखू एकत्र वापरल्याने तुमची शक्यता आणखी वाढते.
१०. सूर्याच्या अतिनील किरणांच्या थेट संपर्कात आल्याने ओठांचा कर्करोग होऊ शकतो.
तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे (Mouth Cancer Symptoms in Marathi) खालीलप्रमाणे आहेत
१. तोंडात सूज किंवा गुठळ्या येणे
२. श्वासात दुर्गंधी असणे
3. ओठ, हिरड्या, गालावर किंवा तोंडाच्या आतल्या इतर भागात लाल किंवा पांढरे ठिपके दिसून येणे
४ . तोंडात रक्तस्त्राव होणे
५.. चेहरा, तोंड किंवा मानेच्या कोणताही भाग सुन्न पडणे
६ . चेहऱ्यावर, मानेवर किंवा तोंडावर ज्यामधुन रक्तस्त्राव होतो आणि जे 2 आठवड्यांच्या आत बरे होत नाहीत असे फोड येणे
७ . घशाच्या मागील बाजूस वेदना होणे
८ . गिळताना , बोलताण किंवा जबडा किंवा जीभ हलवण्यात त्रास होणे
९.. आवाजात कर्कशपणा, तीव्र घसा खवखवणे किंवा आवाजात बदल वाटणे
१० . कान दुखणे
११ . जबड्याच्या ठेवणीत बदल होणे
१२ . अचानक वजन कमी होणे
तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, ताबडतोब तुमच्या नजीकच्या दंतचिकित्सक किंवा डॉक्टरशी त्वरित संपर्क साधा. तोंडाच्या कर्करोगाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही डॉ सुमित शाह यांना संपर्क करू शकता. डॉ सुमित शाह हे पुण्यातील विख्यात कॅन्सर सर्जन आहेत . ते प्रोलाइफ कॅन्सर सेंटरचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार आहेत.