लॅटिन भाषेत म्यांमा म्हणजे स्तन आणि ग्राफी म्हणजे तपासणी. मराठीत सांगायचे झाले तर आपण जसा छातीचा एक्स-रे करतो तसाच स्तनांचा एका विशिष्ट प्रकारे केला गेलेला एक्स-रे.
मॅमोग्राफी (Mammography) म्हणजेच छातीची एक्स-रे (X-Ray) तपासणी असते. याचा वापर स्तनांच्या कर्करोगाचे (Breast Cancer) निदान करण्यासाठी केला जातो. मॅमोग्राफीच्या साह्याने स्तनांच्या कर्करोगाचे निदान त्याच्या प्राथमिक अवस्थेत केले जाऊ शकते. कधी- कधी कर्करोगाचे अन्य लक्षण दिसण्याच्या दोन ते तीन वर्ष आधीच कर्करोग असल्याचे कळू शकते.
मॅमोग्राम काढताना एका खास एक्स-रे मशीनसमोर उभे राहायचे असते. तंत्रज्ञ तुमचे स्तन प्लास्टिकच्या प्लेटवर ठेवतात. दुसरी प्लेट वरून तुमच्या छातीवर घट्ट दाबली जाते. एक्स-रे तपासणी दरम्यान, स्टील प्लेट छाती सपाट करते आणि ती स्थिर ठेवते. स्तनावर थोडा दबाव दिला जातो. अश्याच पद्धतीने दुसऱ्या स्तनाचा एक्स-रे केला जातो. प्रत्येक स्त्रीचे मॅमोग्राम थोडे वेगळे दिसतात कारण स्तनाचा आकार वेगळा असतो. आणि ही तपासणी करायला फक्त काही मिनिटे लागतात.
मॅमोग्राफी कोणी करावी? (Who should do mammography in marathi)
साधारणतः ५० ते ७४ वर्षे वयोगटातील स्त्रिया ज्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असेल त्यांनी दर दोन वर्षांत मॅमोग्राफी करावा. तसेच ४० ते ४९ वर्षे वयोगटातील स्त्रियांनी त्यांच्या डाॅक्टरच्या सल्ल्यानुसार कधी आणि किती अंतरावर करावा हे ठरवावे. समजा कुटुंबातील कोणाला स्तनाचा कर्करोग होऊन गेला असेल, किंवा ज्यांना या आधी कर्करोग झालेला आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅमोग्राफी करून घ्यावा.
मॅमोग्राफी कधी करावी? (When to do mammography in marathi)
- मासिक पाळीच्या एक आठवडा आधी किंवा दरम्यान मॅमोग्राफी घेण्याचे टाळावे. कारण तेव्हा स्तन मऊ किंवा सुजलेले असू शकतात.
- मॅमोग्राफी करण्याच्या दिवशी दुर्गंधीनाशक, परफ्यूम किंवा पावडर वापरू नका. ही उत्पादने क्ष-किरणांवर पांढरे डाग म्हणून दिसू शकतात.
- मॅमोग्राफीसाठी कंबरेपासून वरचे कपडे काढावे लागतात, त्यामुळे तसे कपडे परिधान करावे.
मॅमोग्राफी का करावी? (Why to do mammography in marathi)
मॅमोग्राफी स्तनाच्या कर्करोगाची शक्यता तपासण्याचे सर्वात सुलभ साधन आहे. यामुळे कर्करोग वाढण्या आधीच त्यावर उपचार सुरू करता येतात. तसेच नियमित मॅमोग्राफी केल्याने स्तनांच्या कर्करोगाने होणाऱ्या मृत्यू वरही आळा घालता येतो. मॅमोग्राफीचा रिपोर्ट अपेक्षित आला नसेल तर याचा अर्थ नेहमीच कर्करोग असतो असे नाही. कारण, डॉक्टर खात्री करण्याआधी अतिरिक्त चाचण्या करण्यास सांगतात.
तुम्हाला कर्करोग विशेषज्ञ किंवा सर्जनकडे देखील तपासणीसाठी पाठवले जाते. त्यामुळे ही चाचणी सांगितली म्हणजे कॅन्सर आहे समजून घाबरून जाऊ नका. योग्य दवाखान्यात जाऊन कॅन्सर नसल्याची खात्री करून घ्या. प्रोलाइफ कॅन्सर सेंटर येथे सर्व चाचण्या योग्य पद्धतीने केल्या जातात.
डॉ. सुमित शाह हे प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. या कॅन्सर सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात. डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत.