सर्व प्रकारच्या कर्करोगांवर आधुनिक तंत्र व अनुभवी तज्ञांद्वारे प्रभावी उपचार करण्याचे कार्य पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटर करत आहे. या सेंटरमधील डॉ. सुमित शहा हे कर्करोगाची यशस्वी चिकित्सा करणारे शल्यविशारद म्हणून सुप्रसिद्ध आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून चीनमध्ये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड डीएनए डे 2018 या जागतिक परिषदेत त्यांना खास निमंत्रित करण्यात आलं होतं.नुकत्याच दिल्लीमध्ये होणाऱ्या अन्ननलिका व जठराच्या आजार व कर्करोगावर होणाऱ्या जागतिक परिषदेत त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलेले आहे
डॉ. शहा यांच्या अनुभवातून सांगतात की, जठराच्या कर्करोगाचे (Stomach Cancer) प्रमाण भारतात वाढताना दिसत आहे. खाल्लेले अन्न साठविण्याचे काम जठर करत असते, परंतु तणावग्रस्त जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि निकृष्ट अन्न यामुळे सध्या जठराच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चाललेले दिसत आहे. जठराचा कर्करोग हा जगात चौथ्या क्रमांकावरचा कर्करोग आहे आणि जठराच्या कर्करोगामध्ये भारतीय पुरुषांमध्ये होणारा तिसऱ्या क्रमांकाचा कॅन्सर आहे. पूर्वी ‘भारतीय लोक सकस आहार घ्यायचे. यामध्ये ताजे व शिजवलेल्या अन्नाचा समावेश होता, पण आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे साठवलेले, जास्त तळलेले आणि मांसाहाराच्या वाढत्या प्रमाणामुळे भारतात जठराचा कर्करोग वाढताना दिसत आहे. मांसाहारातही रेड मीट म्हणजे बीफ खाण्यामुळे हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर तंदूरचे पदार्थ, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, अतिप्रमाणात मद्यपान ही देखील जठराच्या कर्करोगाची प्रमुख कारणे आहेत. जठराचा कर्करोग झाल्याची लक्षणे फारशी दिसून येत नाहीत, पण सतत अपचन किंवा पोटात दुखणे, बेंबीच्या कडेला सतत दुखणे ही साधारण लक्षणे म्हणता येतात. याव्यतिरिक्त छातीत दुखणे, जळजळ, गिळण्यास त्रास होणे किंवा उलटी होणे, अचानकपणे वजन कमी होणे, विष्ठा काळी होणे, शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होणे या त्रासांमागेही जठराचा कर्करोग असू शकतो. ही लक्षणे जाणवत असल्यास लगेच गॅस्ट्रोस्कोपी करून तपासणी करून घ्यावी.
या तपासणीत कर्करोगाच्या पेशी आढळल्या तर कर्करोगाची अवस्था जाणून घेण्यासाठी पोटाचा सिटी स्कॅन केला जातो. यातून जठराच्या कोणत्या भागात, किती प्रमाणात कॅन्सर पसरलेला आहे हे कळते. शरीरातील इतर अवयवांतही कर्करोगाचा प्रादुर्भाव पाहण्यासाठी पेट स्कॅन केले जाते. जर कर्करोग जठरापुरता मर्यादित असेल तर शस्त्रक्रिया केली जाते. जठराच्या शेजारच्या अवयवांमध्येही कर्करोगाची लागण झालेली असेल तर केमोथेरेपी दिली जाते. या थेरेपीतून जठराच्या कॅन्सरची अवस्था ऑपरेशन करण्यासाठी योग्य केली जाते. पूर्वीच्या काळी पोट उघडून ही शस्त्रक्रिया केली जात असे. प्रोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते. याचे मुख्य फायदे म्हणजे आजार मुळासकट काढता येतो. रुग्णाची रिकव्हरी लवकर होते, चिरफाड नसल्यामुळे जखम भरायला वेळ द्यावा लागत नाही, जखमेत जंतूबाधा किंवा हर्निया होत नाही.
डॉ. सुमित शहा यांनी आतापर्यंत 10000 पेक्षा अधिक रुग्णांना सुयोग्य मार्गदर्शन केले आहे.जठराच्या व इतर सर्व प्रकारच्या कर्करोगासंबंधित अधिक माहिती किंवा तपासणीसाठी पुण्यातील स्वारगेटजवळ असलेल्या सेव्हन लव्हज चौकात असणाऱ्या प्रोलाईफ कॅन्सर सेंटरला अवश्य भेट द्यावी.
संपर्क – +91 96070 79019