भारतीय स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा पहिल्या क्रमांकावर येतो . दरवर्षी भारतात एक लाख साठ हजार स्त्रियांना स्तनाचा कर्करोग होतो, आणि जवळ जवळ ऐंशी हजार स्त्रिया स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी होतात . स्तनाच्या कर्करोगामुळे मृत्युमुखी होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात जास्त आहे. बावीस महिलांमध्ये एका महिलेला स्तनाच्या कर्करोगाची लागण होण्याची शक्यता असते.
जर आपण पहिले तर शहरी स्त्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ग्रामीण स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते तसेच ग्रामीण स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. दुर्दैवाने भारतीय स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग तरुणपणी म्हणजेच वयाच्या तिशीनंतरही होताना आढळतो. साधारणतः १६% कर्करोग हे ३०-४० वयोगटातील स्त्र्यियांमध्ये होतात, तर ४५- ५५ वर्षे या वयोगटातील स्त्रियांना स्तनाचे कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
स्तनामध्ये कोणतीही गाठ असणे हे स्तनाच्या कर्करोगाचे पहिले प्रमुख लक्षण आहे , कितीही लहान गाठ असली तरी ती स्तनाचा कर्करोग असू शकते. दुसरे प्रमुख लक्षण म्हणजे स्तनाग्रहः (निप्पल) मधून रक्तस्त्राव होणे , काळसर पाणी किंवा साधे पाणी येणे . याशिवाय निप्पल मागे ओढले जाणे , निप्पलच्या कडेला जखमा होणे ज्या भरत नाहीयेत किंवा दोन्ही स्तनांमध्ये लहान – मोठे पणा येणे , स्तनावर जी त्वचा आहे ती जाड होणे किंवा काखेत गाठ जाणवत असेल तर ही सर्व स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.
स्तनाच्या कर्करोगाची कारणे (Breast Cancer Reasons in Marathi)
स्तनाच्या कर्करोगाची काही करणे अशी ही आहेत जी आपण बदलू शकतो – जसे की पाळी बंद झाल्यावर जर लठ्ठपणा आलाअसेल, हे प्रमुख कारण आहे. तसेच व्यायामाचा अभाव, स्तनपान न करणे, काही स्त्रियांमध्ये गर्भधारणा न होणे ही करणे आहेत. शहरी जीवनामधील स्त्रियांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले आहे, हे देखील स्तनाचा कर्करोग होण्याचे कारण आहे. तसेच पाळी बंद झाल्यानंतरची जी लक्षणे असतात ती कमी होण्या साठी ज्या गोळ्या घेतल्या जातात, यामुळे सुद्धा स्तनाचा कर्करोग होण्याची श्यक्यता वाढते. लठ्ठपणा वर नियंत्रण ठेवणे, नियमित व्यायाम करणे , मद्यपान न करणे, बाळ झाल्या नंतर नियमित स्तनपान करणे. या सर्व गोष्टी केल्या मुळे नक्कीच आपण स्तनाच्या कर्करोगावर नियंत्रण ठेऊ शकतो.
प्रत्येक स्त्रीने वयाच्या २१व्या वर्षा नंतर जर स्वस्तनाचे परीक्षण केले तर आपल्याला सुरवातीच्या पातळीतच कर्करोगाचे निदान होऊ शकते. पाळी नंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी स्वस्तनाचे परीक्षण आणि हातानी तपासणी करताना स्तनातील गाठ, स्तनाग्रहः (निप्पल) मध्ये झालेले बदल किंवा त्वचे मध्ये झालेले बदल जर आढळले तर आपण कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर आपण लवकर कॅन्सरवर उपचार करू शकतो. शिवाय प्रत्येक स्त्रीने वयाच्या चाळीशी नंतर मेमोग्राफी (Mammography) करणे गरजेचे आहे.
स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे (Breast Cancer Symptoms in Marathi)
स्तनांचा कर्करोग संभाव्य लक्षणे आढळ्यास बायोप्सी करणे गरजेचे असते यात स्तनाच्या गाठीतून काही पेशी व गाठीचा काही भाग काढून तो तपासणी साठी पाठवला जातो त्या भागाचे व पेशींचे सूक्ष्मदर्शकीकेखाली निरीक्षण करून कर्करोगाचे निदान करतात. यानंतर आजाराची स्टेज कोणती आहे यासाठी काही तपासण्या करणे आवश्यक असते. सुरवातीची लहान गाठ असेल तर जास्त तपासणी करण्याची गरज नसते. पोटाची सोनोग्राफी, लिव्हर फंक्शन टेस्ट आणि छातीचा एक्सरे करूनआपण त्याचे निदान करु शकतो, पण जर गाठ मोठी असेल आणि काखेत गंडमाळ्याच्या गाठी आल्या असतील तर आपल्याला सिटी स्कॅन किंवा पेट स्कॅन करावे लागते.
इतर कर्करोगां प्रमाणेच स्तनाच्या कर्करोगांच्याही चार स्टेज असतात. पहिल्या स्टेज मध्ये कर्करोगाची गाठ ही २ सेन्टीमीटर पेक्षा लहान असते, तीच दुसऱ्या स्टेज मध्ये २ ते ५ सेन्टीमीटर असते, तिसऱ्या स्टेज मध्ये ५ सेन्टीमीटरपेक्षा मोठी असते. जर ही गाठ खाली छातीच्या स्नायूला किंवा त्वचेला चिकटली असेल तर आपण तिला चौथी स्टेज म्हणतो. याच बरोबर गंडमाळेंच्या गाठी जर काखेत किती आहेत त्यावर त्याचे स्टेजिंग ठरले जाते. साधारणतः काखेतील गंडमाळ ही तिसरी स्टेज असते आणि हाच आजार जर दुसऱ्या अवयवांमध्ये पसरला असेल म्हणजे फुफुसांत, हाडांत व मेंदूत पसरला गेला असेल तर त्यास चौथी स्टेज म्हटले जाते.
स्तनाच्या कर्करोगाची उपचार (Breast Cancer Treatment in Marathi)
स्तनाच्या कर्करोग उपचार पद्धतीमध्ये भरपूर सुधारणा झाल्या आहेत. आज आपल्याला पूर्वीप्रमाणे पूर्ण स्तन काढण्याची गरज नसते. स्तन संवर्धन शस्त्रक्रिया करून फक्त कर्करोग असलेला भाग काढता येतो. यामुळे स्त्रियांचे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही. तसेच वैवाहिक व सामाजिक जिवनात संकोचल्यासारखे होत नाही. आजार बारा झाल्यनंतर आयुष्य हे आनंदी जगणे सोपे होते.स्तनाच्या कर्करोगाचे उपचार हे तो कोणत्या स्टेज मध्ये आहे यावरून ठरवले जाते.
पहिल्या व तिसऱ्या स्टेज मधील कर्करोग हे मुख्यतः सर्जरी करून बरे केले जातात, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेज मध्ये स्तनाचे संवर्धन करतात. पण स्तन संवर्धन प्रक्रिये मध्ये क्ष किरणांचे उपचार (X-ray Treatment) घेणे आवश्यक असते. तसेच आपण जेनेटिक टेस्ट (Genetic Test) करून रुग्णाला किमोथेरपी पासून वाचवू शकतो. पण ज्यावेळी कर्करोग परत होण्याची संभाव्यत असेल तर किमोथेरपी (Chemotherapy) किंवा हार्मोनथेरपी (Harmontherapy) दिली जाते. चौथ्या स्टेजला किमोथेरपी, हार्मोनथेरपी किंवा टार्गेटेडथेरपी (Targetedtherapy) दिली जाते. जेनेटिक तपासणी करून ठरवले जाते कि या सर्व थेरपी मधील कोणती थेरपी रुग्णाला देण्याची आवश्यक्यता आहे.
किमोथेरपी (Chemotherapy Treatment in Marathi)
आज किमोथेरपीच्या (Chemotherapy) शात्रातही भरपूर सुधारणा झाल्या आहेत. पूर्णपणे वेदनारहित व साईडइफेक्ट न होता किमोथेरपी देणे शक्य होते. साधारणतः एखाद्या रुग्णाला किमोथेरपीची गरज भासल्यास ती ६-८ वेळा द्यावी लागते. प्रत्येक वेळेस हातातील नसेतून किमोथेरपी देणे त्रासदायक होते. बऱ्याच वेळा नसा सापडत नाहीत किंवा हाताला सूज येणे, हात दुखणेअसे त्रास होतात. हे टाळण्यासाठी वेदनारहित किमोथेरपी देता येते, यासाठी किमोपोर्ट (Chemoport ) नावाचे साधन वापरले जाते. किमोपोर्ट हे छोटीशी शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या छातीवरील स्नायूत बसवतात व त्याची नळी मानेतील रक्तवाहिनीत सोडली जाते यानंतर सर्व औषधे किमोपोर्टच्या चेंबरमधून दिली जातात. यामध्ये कुठेही हाताला सुई लावण्याची गरज नसते. ही पूर्ण वेदनारहित पद्धत आहे. तसेच रुग्ण हाताचा वापर करू शकतात व आपली सर्व कामे पूर्ववत करू शकतात.
डॉ. सुमित शहा यांनी आतापर्यंत 20000 पेक्षा अधिक रुग्णांना सुयोग्य मार्गदर्शन केले आहे. स्तनाचा कर्करोग व इतर सर्व प्रकारच्या कर्करोगासंबंधित अधिक माहिती किंवा तपासणीसाठी पुण्यातील स्वारगेटजवळ असलेल्या सेव्हन लव्हज चौकात असणाऱ्या प्रोलाईफ कॅन्सर सेंटरला (Prolife Cancer Centre) अवश्य भेट द्यावी.
डॉ. सुमीत शहा – ऑन्कोलॉजिस्ट (Oncologist)