ब्रेस्ट सिस्ट(Breast cyst)
आजकाल तरुण म्हणजे अवघ्या 30- 40 वयाच्या महिलांमधे स्तनामधे सिस्ट (Breast cyst) किंवा गाठ आढळून येत आहे. सिस्ट (Cyst) म्हणजे द्रव पदार्थाने भरलेली एक छोटी थैली. सामान्यत: स्त्रियांमधे रजोनिवृत्तीच्या आधी याचे प्रमाण आढळते. साधारणपणे स्तनांमधले ब्रेस्ट सिस्ट या आकाराने छोट्या व वेदनारहित असतात. एका स्तनामध्ये एकापेक्षा जास्त सिस्ट आढळू शकतात. रजोनिवृत्ती नंतर या सिस्ट कमी झालेल्या आढळतात. परंतु हार्मोन थेरपी (Harmone therapy) घेत असलेल्या महिेलांमधे सुद्धा सिस्टचे प्रमाण परत दिसू लागते.
विशेष म्हणजे किशोरवयीन मुलींमधेसुध्दा याचे प्रमाण आढळते. जोपर्यंत सिस्टमधे वेदना नसतील तोपर्यंत त्याच्यावर उपचाराची गरज नसते. परंतु वेदना असल्यास सिस्टमधील द्रव पदार्थ काढून त्याचा त्रास कमी केला जातो. स्तनामधील दूध ग्रंथिंच्या वाढीमुळे सिस्ट तयार होतात. त्यांचा आकार मटारच्या छोट्या दाण्यापासून ते टेबल टेनिसचा बॅाल एवढा मोठा असू शकतो. शारीरिक तपासणी दरम्यान आकाराने छोटे सिस्ट सापडतीलच असे नाही. आणि मोठ्ठे सिस्ट हे गाठीसारखे वाटू शकतात.
सिस्टची काही लक्षणे (Symptoms of Cyst in Marathi)
- सिस्टच्या भागात मऊपणा किंवा वेदना.
- मासिक पाळीच्या आधी वाढलेला आकार व मऊपणा.
- मासिक पाळीनंतर कमी झालेला आकार
- साधारणपणे स्तन सिस्टला उपचारांची गरज पडत नाही पण स्तनातून जर रक्त येत असेल तर शस्त्रक्रियेचा विचार करावा लागतो.
फायब्रोएडेनोमास (Fibroedenomas)
स्तनातील तंतूंमधे असामान्य वाढ होवून गाठीं तयार होतात. या गाठी आकाराने गोल किंवा अनियमित आकाराच्या, वेदनादायी किंवा वेदनारहित, मऊ किंवा कडक,कर्करोगयुक्त किंवा कर्करोगरहित असू शकतात. फायब्रोएडेनेमा ही स्त्रियांमध्ये आढळणारी सर्वसामान्य गाठ आहे. फायब्रोएडेनॉमामध्ये, स्तनातील तंतू आणि ग्रंथीतील तंतू दोघांची असामान्य वाढ होते. या गाठी सामान्यपणें मऊ ते कडक असतात आणि त्यांची स्तनामधे हालचाल होऊ शकते.त्या स्तनातील तंतूशी जोडलेल्या असतात.
काही घटनांमधे स्त्रियांमधे प्रसुती दरम्यान स्तनामध्ये वेदनारहित, कडक, व हळूहळू वाढणारी गाठ दिसू शकते. तरुण वयातील स्त्रीयांमध्ये सर्वसामान्यपणे आढळणारा हा ट्यूमर (Toumour) आहे तर काही प्रमाणात रजोनिवृत्ती नंतर ही हा ट्यूमर सापडतो. वाढत्या वयानुसार याचे प्रमाण कमी होत गेलेले दिसते. पण वयाच्या 30 वर्षाच्या आत याचे प्रमाण जास्त दिसून येते. जे साधारणपणे ऑस्ट्रोजन हार्मोन्स मधील चढ- उतारामुळे होऊ शकते. पुरुषांमधे सुध्दा फायब्रोएडेनोमा ट्यूमर आढळून आल्याच्या काही दुर्मिळ केसेस आहेत. ऑटीऑस्ट्रोजन उपचारांचा येथे चांगला परिणाम दिसून येतो. अल्ट्रा साऊंड, मॅमोग्राफी (Mammography) व नीडल बायोप्सीने फायब्रोऊडेनोमाचे निदान होऊ शकते.
डॉ. सुमित शाह हे प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट चे संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (Surgical Oncologist) आणि लॅपरोस्कोपिक सर्जन (Laparoscopic surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे. डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप