‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’
कर्करोग म्हणजे मरणाची चाहूल, असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ती नव्या जीवनाची सुरुवातच मानायला हवी. कॅन्सरमुळे रुग्णाची इच्छाशक्ती वाढून त्याला जगण्याची प्रेरणा मिळते.
कर्करोग निदानासाठी समर्पित असलेले पुण्यातील एकमेव रुग्णालय ‘प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’. कॅन्सरच्या रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशन ही कॅन्सरच्या उपचाराची त्रिसूत्री असते. या तीनही शाखांमध्ये प्रावीण्य मिळविलेले कर्करोगतज्ज्ञ हे प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे बलस्थान आहेत. इतर मोठमोठ्या रुग्णालयांत कॅन्सर उपचाराची एखादी विंग असते. अशावेळी कॅन्सरच्या रुग्णांकडे विशेष लक्ष दिले जात नाही. मुंबईमध्ये कॅन्सरच्या गुंतागुंतीच्या उपचारांसाठी टाटा कॅन्सर हे नावाजलेले हॉस्पिटल आहे. त्याच धर्तीवर देशातील वेगवेगळ्या महानगरांमध्ये कॅन्सरवर उपचार करणारी खास रुग्णालये देखील पाहायला मिळतात. त्यांच्याच यादीत पुण्यातील प्रोलाईफ कॅन्सर सेंटरने आता नावलौकिक मिळवून पुण्यातील टॉप कॅन्सर निदान करणार्या हॉस्पिटलची पोकळी भरून काढली आहे.
कॅन्सरचे सर्व उपचार उपलब्ध करणे इतका मर्यादित दृष्टिकोन ठेवून डॉ. सुमित शहा यांनी हे हॉस्पिटल उभारले नाही, तर कॅन्सरच्या रुग्णांना त्यांचे जीवन पूर्वीसारखे जगता यावे हा ध्यास यामागे आहे. प्रोलाईफ कॅन्सर सेंटरमधील स्टाफ अत्यंत काळजीवाहू आहे. कॅन्सर झालेल्या रुग्णांच्या सेवेचा मोठा अनुभव त्यांच्याकडे असल्याने रुग्णांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर कसलीही काळजी करायची आवश्यकता पडत नाही. शेकडो कॅन्सरग्रस्त रुग्ण येथून बरे होऊन त्यांचे पूर्ववत जीवन आनंदात जगत आहेत. तंदुरुस्त होऊन घरी परतलेले आणि आनंदात दिसणारे रुग्ण यातून मिळणारे समाधान हेच प्रोलाईफ कॅन्सर सेंटरचे फलित आहे.
कॅन्सरचे अचूक निदान आणि परिणामकारक उपचार म्हणजे प्रोलाईफ कॅन्सर सेंटर असे समीकरण निर्माण झाले आहे. कॅन्सर हा खरोखरच आव्हानात्मक आजार आहे. कारण या आजाराच्या प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक काळजी घ्यावी लागते. त्यासाठी ३६० अंशांमध्ये उपचाराचे बारकाईने नियोजन करावे लागते. रुग्णाचा फक्त कर्करोग बरा करायचा एवढेच नाहीतर भविष्यात सामान्य माणसाप्रमाणे वावरता आले पाहिजे, हा विचार करून उपचाराचे नियोजन करणे, हे प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वैशिष्ठ्य ठरले आहे. कर्करोगाबद्दलची भीती घालवणे हे या हॉस्पिटलचे मिशन बनले आहे. कॅन्सरचा रुग्ण पूर्णतः बरा होऊ शकतो, हा विश्वास निर्माण करणे ही आता काळाची गरज आहे. त्यादृष्टीने या हॉस्पिटलकडून तळमळीने प्रयत्न केले जातात.
कॅन्सर म्हटले की, उपचाराचा खर्च किती, हा सामान्य रुग्णांना आणि त्यांच्या घरच्यांना पडणारा मुख्य प्रश्न असतो. प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये सामान्य रुग्णाला परवडेल अशीच सुविधा आहे. कॅन्सर झाल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेण्यापेक्षा तो होऊच नये, यासाठी प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरते. या दृष्टिकोनातून प्रोलाईफ कॅन्सर सेंटर अँड रिसर्च इन्स्टिट्यूट वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोग तपासणीची शिबिरे आयोजित करतात. सामाजिक बांधीलकी जपणे हे या रुग्णालयाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. त्याची जोपासना करीत कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमित शहा यांनी आतापर्यंतची वाटचाल केली आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग कशा स्वरूपाचे असतात, त्यांची काळजी कशी घ्यावी, उपाययोजना काय? याची माहिती थोडक्यात घेऊया.
तोंडाचा कर्करोग : तोंडाचा कर्करोग म्हणजे तोंडाच्या कोणत्याही एका भागात ट्यूमर विकसित होणे. हा कर्करोग जिभेच्या पृष्ठभागावर, जिभेच्या खाली, गालांच्या आतील बाजूस, तोंडाच्या छतावर (टाळू), ओठ किंवा हिरड्या यापैकी कोणत्याही भागात होऊ शकतो. भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा टॉप ३ कर्करोगांपैकी एक आहे. ज्यामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका दुप्पट असतो. तसेच ५० पेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना याचा सर्वात मोठा धोका असतो.
तोंडाच्या कर्करोगाची कारणे खालीलप्रमाणे आहेत – तोंडाचा कर्करोग वाढण्यास अनेक वर्षे लागू शकतात. बर्याच लोकांत ५५ वर्षांनंतर तो आढळतो. परंतु अधिक तरुण पुरुषांना HPV शी संबंधित कर्करोग होत असल्याचे आढळून आले आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता किमान दुप्पट असते. याचे कारण असे की, पुरुष महिलांपेक्षा जास्त मद्यपान करतात आणि धूम्रपान करतात. जर कुटुंबामध्ये कोणाला आधी कर्करोग झालेला असेल तर त्या व्यक्तीचा तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
सिगारेट, सिगार किंवा पाईप धूम्रपान करणार्यांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता धूम्रपान न करणार्यांपेक्षा सहापटीने जास्त असते. तंबाखूतील रसायनांमुळे तोंडाच्या पोकळीतील पेशींमध्ये आनुवंशिक बदल होतात. ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तसेच तंबाखूच्या नियमित सेवनामुळे यकृताचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग आणि अन्ननलिकेचा कर्करोग यासारख्या इतर कर्करोगाचा धोकादेखील वाढवू शकतात. सुपारीचा कॉफीसारखाच उत्तेजक प्रभाव असतो. त्यांच्यात कार्सिनोजेनिक प्रभावदेखील असतो, याचा अर्थ ते तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात. तंबाखूसोबत सुपारी चघळल्याने हा धोका आणखी वाढतो. अस्वास्थ्यकर आहारामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे भरपूर फळे आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. जेणेकरून हा धोका टाळता येऊ शकतो. मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) हा विषाणूंचा एक समूह आहे, जो शरीरातील त्वचा आणि ओलसर पडद्यावर जसे की, गर्भाशय ग्रीवा, गुदद्वार, तोंड आणि घसा यांवर परिणाम करतो. आधीच संसर्ग झालेल्या व्यक्तीशी लैंगिक संपर्क साधून तुम्हाला HPV चा संसर्ग होऊ शकतो. HPV मुळे तोंडाच्या आत ऊतींची असामान्य वाढ होऊ शकते, ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो.
कर्करोगाचा संबंध काहीवेळा दीर्घकालीन जखमांशी असू शकतो. तुटलेले दात किंवा जिभेवर सतत व्रण किंवा जखमा होऊन तेथे तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे तुमचे तोंड आणि दात निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करणे फार महत्त्वाचे आहे. मद्यपान न करणार्यांपेक्षा तोंडाचा कर्करोग मद्यपान करणार्यांमध्ये सहापटीने जास्त आढळतो. अल्कोहोल आणि तंबाखू एकत्र वापरल्याने तुमची शक्यता आणखी वाढते. सूर्याच्या अतिनील किरणांच्या थेट संपर्कात आल्याने ओठांचा कर्करोग होऊ शकतो.
तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत : तोंडात सूज किंवा गुठळ्या येणे, श्वासात दुर्गंधी असणे, ओठ, हिरड्या, गालावर किंवा तोंडाच्या आतल्या इतर भागात लाल किंवा पांढरे ठिपके दिसून येणे, तोंडात रक्तस्राव होणे, चेहरा, तोंड किंवा मानेचा कोणताही भाग सुन्न पडणे, चेहर्यावर, मानेवर किंवा तोंडावर ज्यामधून रक्तस्राव होतो आणि जे दोन आठवड्यांच्या आत बरे होत नाहीत असे फोड येणे, घशाच्या मागील बाजूस वेदना होणे, गिळताना, बोलताना किंवा जबडा किंवा जीभ हलवण्यास त्रास होणे, आवाजात कर्कशपणा, तीव्र घसा खवखवणे किंवा आवाजात बदल वाटणे, कान दुखणे, जबड्याच्या ठेवणीत बदल होणे, अचानक वजन कमी होणे.
स्तनाचा कर्करोग : भारतामध्ये २२ पैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग जडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांमध्ये आढळणार्या स्तनाच्या, गर्भाशय मुखाचा आणि अंडाशयातील अशा विविध प्रकारच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे जाणवते. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी अधिक गैरसमज निर्माण झाले आहेत. विशेषतः हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली हिने स्तन काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केल्यानंतर तर तरुण मुलींमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी एकीकडे जनजागृती झाली, पण दुसरीकडे अनेक गैरसमजही पसरले. सल्ला घेतल्यास त्यांच्या मनातील अनेक गैरसमज दूर होऊ शकतात. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे आता पूर्वीप्रमाणे कर्करोग झालेला स्तन पूर्णपणे काढून टाकण्याची गरज नसते. ट्यूमरचा आकार लहान असेल तर स्तन संवर्धनाची शस्त्रक्रिया करता येते. तसेच, ट्यूमरचा आकार मोठा असला तरी केमोथेरपीच्या मदतीने स्तन संवर्धनाच्या शस्त्रक्रियेत यश मिळते. प्लास्टिक सर्जरी, तसेच कृत्रिम स्तनांचा पर्यायही उपलब्ध आहे. यामुळे महिलांनी घाबरून न जाता तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने उपचारांची पद्धत निवडण्याची गरज असते. वयाच्या ३० वर्षांनंतर दर महिन्याला स्वतःच स्वतःच्या स्तनाची तपासणी ठरावीक वेळेला व पद्धतीने करा. वयाच्या ४० वर्षांनंतर मॅमोग्राफी (स्तनाचा एक्स-रे) दरवर्षी करून घ्या. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत क्लिनिकल तपासणी करून घ्या. स्तन संवर्धन शस्त्रक्रिया आँकोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरी फ्लॅप रिकन्स्ट्रक्शन, इम्प्लांट, सेंटिनल लिंफ नोड बायोप्सी यासह उपलब्ध अनेक पर्यायांपैकी एक पर्याय डॉक्टरांच्या सल्ल्याने निश्चित करा. एक लाख महिलांमध्ये २५.८ महिला स्तनाच्या कर्करोगाने बाधित. एक लाखापैकी १२.७ महिला दगावतात (केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार) गर्भाशय मुखाचे कर्करोग (सर्व्हिकल कॅन्सर) व आधुनिक उपचार पद्धती गर्भाशयाचा कॅन्सर; सर्व्हिक्स (स्त्रियांच्या गर्भपिशवी व योनीला जोडणारा अवयव)च्या उतीमध्ये तयार होणारा हा गर्भाशयाचा कर्करोग सर्वसाधारणपणे साठी ओलांडल्यानंतर उद्भवणारा हा आजार ८०% स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यावर आढळतो.