मानवाच्या शरीरातील एखाद्या अवयवात पेशींची बेसुमार वाढ होऊ लागते. त्यांचा शरीरात एक गोळा (Tumour) तयार होतो. पेशींच्या या अनियंत्रित वाढीस कर्करोग (Cancer) म्हणतात. कॅन्सरवर केल्या जात असलेल्या उपचारांमधील केमोथेरपी (Chemotherapy) ही एक उपचार पध्दती आहे. केमोथेरपी पध्दतीमध्ये अनियंत्रित वाढलेल्या पेशी औषधाच्या मदतीने नष्ट केल्या जातात. कॅन्सर उपचारावरील औषधे आयव्ही लाईनच्या माध्यमातून, इंजेक्शनद्वारे थेट रक्तवाहिन्यांमध्ये दिले जाते. रुग्णाच्या गरजेनुसार आयव्ही औषधांची ६ ते ८ चक्रे घ्यावी लागतात. केमोथेरपीच्या या चक्रांमध्ये कमीतकमी ३ -४ आठवड्यांचे अंतर ठेवावे लागते.
केमोथेरपीमध्ये रासायनिक संयुगे (Chemical compounds) वापरून कॅन्सरच्या पेशींना मारून टाकण्यासाठी तसेच कॅन्सर शरीराच्या अन्य भागात पसरू नये यासाठी केमोथेरपी सर्वात प्रभावी ठरते. या उपचार पद्धतीत थेट रक्तात औषध दिले जाते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी शोधून त्यांचा समूळ नायनाट होतो आणि त्याच्या आजूबाजूला ज्या चांगल्या पेशी आहेत त्यांना कुठेही धक्का लागून नुकसान होत नाही.
कॅन्सर कुठलाही असो त्याचे वर्गीकरण तीन प्रकारात होते. कॅन्सरची सुरुवात, मध्य आणि शेवटची पातळी. केमोथेरपीचे फायदे तुम्ही कुठल्या पातळीवर उपचार घेत आहात यावर ठरते.
केमोथेरपीचे फायदे (Chemotherapy benefits in maarthi)
- कॅन्सरचे निदान सुरुवातीलाच झाले आणि केमोथेरपीचे उपचाराची गरज पडल्यास तो समूळ नष्ट होण्यास मदत होतो.पुढचे काही वर्ष नियमित सगळ्या शारीरिक चाचण्या कराव्या लागतात .
- जर कॅन्सरची दुसरी पायरी असेल तर केमोथेरपी व नियमित डॉक्टरच्या सल्ल्याने औषधे घेऊन कॅन्सर बरा होतो. कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन करायच्या आधी केमोथेरपीने कॅन्सरची गाठ कमी करून मगच त्या भागाला काढून टाकता येते आणि कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखता येतो.
- कॅन्सर शेवटच्या पायरीचा असेल तर केमोथेरपीने कमी त्रास होतो व थोडे जास्त दिवस मिळायला मदत होते. नियमित शारीरिक चाचण्या व डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेऊन हा आजार लांबवता येतो.
- कॅन्सर मध्ये पेशी लवकर वाढतात. अशा वेळेस केमोथेरपी कॅन्सर पेशींचा नायनाट करते व पुढे वाढण्यास प्रतिबंध करते.
- केमोथेरपी इंजेक्शन द्वारा थेट रक्तवाहिन्यांमध्ये देण्यात येते. सलाईन द्वारा रक्तवाहिन्यांना धक्का न लावता व उपचार केले जातात.
डॉक्टरांच्या सल्ल्याने केमोथेरेपीच्या संख्या व दिवस ठरवले जातात. उदाहरणार्थ काही रुग्णांना पंधरा दिवसातून एकदा तर काहींना पंधरा दिवसात एक किंवा दोन केमोथेरपी त्यांच्या आजाराच्या गांभीर्ययावर ठरवल्या जातात. कॅन्सरवर केमोथेरपी (Chemotherapy), रेडिएशन थेरपी (Radiation therapy) हेच प्रभावी उपचार आहेत.
आजाराला न घाबरता योग्य उपचार पद्धतीने या आजारावर आपण मात करू शकतो. प्रोलाइफ कॅन्सर सेंटर येथे केमोथेरपीचे उपचार केले जातात.
डॉ. सुमित शाह हे प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात. डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट (Surgical oncologist) आणि लॅपरोस्कोपिक सर्जन (Laparscopic surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे. डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह,
शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप.