कॅन्सर आणि केमोथेरपी समज व गैरसमज
कॅन्सर,ज्याचं नाव ऐकलं की पायाखालची जमीन सरकते. पण कोणत्याही रोगावरती सकारात्मक दृष्टिकोन , सकारात्मक विचार ,डॉक्टरांचा योग्य सल्ला, योग्य उपचार ,यांनी मात करता येते.कॅन्सर जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर बरा होतो. त्यांचे निदान होते, व रुग्णावर उपचार सुरु होतात. कॅन्सरला प्रभावी उपचार म्हणून केमोथेरपी करायला सांगितले जाते. पण याबद्दल अनेक प्रश्न असतात. याबद्दल अनेक समज गैरसमज असतात. केमोथेरपीच्या औषधांमुळे दुष्परिणाम होतात का? काही पेशंटना या औषधांमुळे त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. योग्य काळजी घेतल्यास केमोथेरपीचे दुष्परिणाम टाळता येतात.कॅन्सर आणि केमोथेरपी (Cancer and Chemotherapy) अनेक समज आणि गैरसमज आहेत.
केमोथेरपी इंजेक्शनद्वारे थेट रक्तवाहिन्यांमध्ये(blood vessels) देण्यात येते.
औषध शरीरात सहजतेनं आवश्यक तिथे पोहोचावं यासाठी सलाईन ड्रिपद्वारेही (saline drip) केमोथेरपी देण्यात येते. असं केल्याने रक्तवाहिनीला धक्का न लावता उपचार होतात.एखाद्या रुग्णाला उपचारांसाठी सातत्याने वेगवेगळ्या औषधांची आवश्यकता असेल तर त्याला किंवा तिला दरवेळी नवं इंजेक्शन घ्यायला लागू नये म्हणून रक्तवाहिनीमध्ये ट्यूब बसवण्यात येते. ट्यूब सीरिंजला जोडलेली असते.
केमोथेरपीचे घेतल्यानंतर काही पेशंटना मळमळ आणि उलटीचा (Nausea and vomiting) त्रास होतो. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हा त्रास आटोक्यात आला आहे. केमोथेरपीचा महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे पांढऱ्या पेशी(White blood cells)कमी होणे. त्यामुळे संसर्ग (infection)होऊ शकतो. परंतु आज काल हा संसर्ग होऊ नये यासाठी ग्रोथ फॅक्टरचा वापर करण्यात येतो. थेरपी सुरू केल्यानंतर केस जातात. पण, ते पाच ते सहा महिन्यांनंतर पुन्हा येतात.
केमोथेरपी सुरू विशेष काळजी घ्यावी लागते त्यामुळेही पुढचा त्रास टाळता येतो. जसे की पाणी उकळून प्यावे,कच्चे पदार्थ खाणे टाळावे , गर्दीमध्ये जाऊ नये,नाकावर मास्क लावावा फळे साली काढून खावीत.
टार्गेटेड थेरपीची औषधे ही केवळ कॅन्सरच्या पेशींवर वार करतात. त्यामुळे सर्वसामान्य पेशींना त्याचा त्रास होत नाही. या औषधांचा दुष्परिणाम खूप कमी होतो. अनेक कॅन्सरच्या प्रकारांमध्ये ही थेरपी उपलब्ध आहे.
किमोथेरपी नेहमी प्रशिक्षित ऑन्कोलॉजिस्टने द्यावी. ही औषधे जेनेरिक फॉर्म मध्ये उपलब्ध असल्याने आता भारतीय कंपन्यासुद्धा ही औषधे बनवत आहेत. त्यामुळे या औषधांच्या किंमती आटोक्यात आल्या आहेत. ही औषधे देण्यासाठी आता काही वैद्यकीय मदत देणाऱ्या सामाजिक संस्था पुढाकार घेऊ लागल्या आहेत. कॅन्सरच्या काही विशिष्ट प्रकारांमध्ये आता गोळ्याही उपलब्ध आहेत, मात्र त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हव्यात.
डॉ. सुमित शाह
डॉ. सुमित शाह प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट (Prolife Cancer Center and Research Institute) संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन(Surgical Oncology and Laproscopic Surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे.डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेले आहेत.