कुठल्याही आजाराची माणसाला भीती वाटतेच. त्यात कॅन्सर हा अत्यंत जीवघेणा आजार आहे. या आजारात शरीराच्या कोणत्याही भागात पेशींचे अनियंत्रित विभाजन होते. हा आजार वाढत गेल्यास तो जीवघेणा ठरतो. कॅन्सरच्या उपचारात केमोथेरपी (chemotherapy)
हा सर्वात लोकप्रिय उपचार आहे. केमोथेरपीचा वापर कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी केला जातो. केमोथेरपी (chemotherapy) कर्करोगाच्या पेशींचा प्रसार थांबवते. कर्करोगाच्या शेवटच्या टप्प्यात प्रतिबंध करण्यासाठी याचा वापर केला जातो. केमोथेरपी दरम्यान कॅन्सर मारणारी औषधे वापरली जातात. या औषधांमुळे कर्करोगाच्या गाठी कमी होतात आणि पसरत नाहीत.
कर्करोगाच्या पेशी शरीरात अनेक प्रकारे पसरतात. या पेशींची वाढ थांबवण्यासाठी केमोथेरपी काही प्रमाणात प्रभावी ठरते. कर्करोगाच्या प्रत्येक रुग्णाच्या पेशी एकमेकांपासून खूप वेगळ्या असतात. एखाद्याची अवस्था जवळपास सारखीच असली, तरी त्यांच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी किती पसरल्या आहेत यावर ते अवलंबून असते. कर्करोगविरोधी औषधे नेहमी औषधे किंवा इंजेक्शनद्वारे घेतली जाऊ शकतात.
केमोथेरपी (chemotherapy) हा कॅन्सरवर उपचार करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. ही थेरपी कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्याचे काम करते. कॅन्सरग्रस्त व्यक्तीला केमो दिल्यास पुन्हा कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी कमी होतो.
केमोथेरपी (chemotherapy) मध्ये कॅन्सरची मुख्य गाठ काढल्यानंतर, या रोगाचा अंश राहिलेल्या पेशींना दूर केल्या जातात. ल्युकेमियासारख्या किंवा रक्ताचा कर्करोगाच्या उपचारांमध्ये केमोथेरपीचा उपयोग करावा लागतो. कारण यात कॅन्सरच्या पेशी संपूर्ण शरीरभर पसरलेल्या असतात.
काहीवेळेला ट्यमूरचा म्हणजेच गाठीचा आकार कमी व्हावा यासाठी केमोथेरपीचा प्रयोग केला जातो. जेणे करून सर्जनला शस्त्रक्रिया करणं सोपं जातं.ज्या रुग्णांचा कॅन्सर बरा होणारा नाही त्यांच्या शरीरातील आजाराची लक्षणं केमोथेरपीमुळे कमी होऊ शकतात.
कॅन्सर तज्ञ डॉक्टर रुगांची पूर्ण अभ्यास करूनच उपचार सुरु करतात . प्रो लाईफ़मध्ये केअर सेंटरमध्ये डॉक्टर सुमित शाह यावर योग्य प्रकारे उपचार केले जातात.
एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी गरज असेल तोपर्यंत केमोथेरपी (chemotherapy) घेऊ शकते. केमोथेरपी उपचारांचा कोर्स औषधाचा प्रकार आणि कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून असतो.
साधारणपणे ती 3-6 महिने असू शकते . डॉक्टर सामान्यत: सायकलमध्ये केमोथेरपी (chemotherapy) देतात, विश्रांतीचा कालावधी 1-4 आठवड्यांच्या दरम्यान असतो. सायकलमध्ये व्यक्तीचे शरीर बरे होण्यासाठी विश्रांतीचा कालावधी असतो.
एखाद्या व्यक्तीवर एका दिवशी उपचार होऊ शकतात, त्यानंतर 1 आठवड्याची विश्रांती, त्यानंतर आणखी 1 दिवसीय उपचार आणि त्यानंतर 3-आठवड्याचा विश्रांतीचा कालावधी अश्या प्रकारे विभागणी केली जाते.
पुण्यात कर्करोगावर उपचार आणि चागंल्या सेवेसाठी प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे चाचण्या आणि उपचार केल्या जातात, उपचारासाठी आजच भेट घ्या.
डॉ. सुमित शाह
डॉ. सुमित शाह प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट (Prolife Cancer Center and Research Institute) संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत. ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन(Surgical Oncology and Laproscopic Surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे.डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेले आहेत.