आज कर्करोगावरील उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे. तोंडाचा कर्करोग: लवकर निदान, आधुनिक उपचार आणि आशेचा किरण हे आज वास्तव आहे. त्याचप्रमाणे रोबोटिक कर्करोग शस्त्रक्रिया : काळाची गरज बनली असून, निवडक रुग्णांमध्ये ती अधिक अचूक, कमी वेदनादायक आणि जलद पुनर्वसनास मदत करणारी ठरते.
उपचारांमध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि रेडिएशन यांचा समावेश असू शकतो. अनेक रुग्ण विचारतात, “टार्गेटेड थेरपी आणि किमोथेरपी यामध्ये काय फरक आहे?” याचे उत्तर म्हणजे प्रत्येक उपचाराची भूमिका वेगळी असते. कर्करोगाचा प्रकार, स्टेज आणि रुग्णाची प्रकृती यानुसार योग्य उपचार निवडले जातात. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला सर्व उपचारांची गरज असतेच असे नाही. योग्य Cancer Treatment Planning केल्यास उपचार प्रभावी आणि खर्चही नियंत्रित ठेवता येतो.
आम्ही आर्थिक मदतीसाठी काय करतो?
Prolife Cancer Centre मध्ये आम्ही रुग्णांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो:
- किफायतशीर Cancer Medicines
- सर्व प्रमुख Health Insurance आणि Cashless सुविधा
- गरजेनुसार Cancer Financial Assistance व सामाजिक संस्थांची माहिती
- प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक Cancer Treatment Planning
आर्थिक कारणांमुळे उपचार उशिरा सुरू करणे किंवा अर्धवट सोडणे हे कर्करोगाविरुद्धच्या लढाईत सर्वात मोठे नुकसान ठरू शकते.
माझा संदेश
मी प्रत्येक रुग्णाला एकच गोष्ट सांगतो—”फक्त कर्करोगाशी लढा… औषधांच्या खर्चाशी नाही.”
योग्य वेळी निदान, आधुनिक उपचार, योग्य आर्थिक मार्गदर्शन आणि अनुभवी तज्ज्ञांचे नियोजन मिळाल्यास अनेक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात.
जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी कर्करोग उपचाराचा खर्च, किफायतशीर कर्करोग उपचार, किंवा आर्थिक मदत याबद्दल माहिती शोधत असाल, तर आमच्या टीमशी संपर्क साधा. आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम, वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि परवडणारा उपचाराचा मार्ग निवडण्यास मदत करू.




