कीमोथेरेपी हा कर्करोगाचा सामान्य उपचार आहे. यामध्ये कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून आणि पसरण्यापासून रोखण्यासाठी शक्तिशाली औषधांचा वापर केला जातो. कीमोथेरेपीमध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. ही औषधे वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाच्या पेशींना त्यांची वाढ कमी करण्यासाठी किंवा कर्करोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लक्ष्य करतात. सामन्यतः कीमोथेरेपीच्या ६,८ सायकल असतात. त्यानंतर अनेक सेशन्स पण असतात. पेनलेस कीमोथेरेपी मध्ये केमो पोर्ट खूप महत्वाची भूमिका बजावते.
कीमोथेरेपी ही वेदनादायी समजली जाते कारण ती हाताच्या नसे मध्ये दिली जायची. त्यामुळे रुग्णाला खूप दुखणे, औषध बाहेर येणे, त्वचेमध्ये जखम होणे असे त्रास व्हायचे. म्हणूनच आता वेदनारहित कीमोथेरेपी केली जाते. पेनलेस कीमोथेरेपीमध्ये केमो पोर्ट हे एक लहान यंत्र वापरले जाते. त्यामुळे केमोथेरपी औषधे शरीरात देण्यासाठी सुईची गरज भासत नाही . ती थेट शरीरात दिली जातात.
केमो पोर्ट हे एक पातळ सिलिकॉन ट्यूब असते जी रक्तवाहिनीला जोडते. पेनलेस कीमोथेरेपी मध्ये केमो पोर्ट खूप महत्वाची भूमिका बजावते.
केमो पोर्ट कुठे लावले जाते?
सहसा, केमो पोर्ट छातीच्या वरच्या भागात असलेल्या मोठ्या रक्तवाहिनीजवळ त्वचेखाली मध्यभागी ठेवलेले असते. हा इंट्राव्हेनस (IV) कॅथेटरसाठी चांगला पर्याय आहे , जो बाह्यरित्या हात किंवा हाताच्या शिरामध्ये ठेवला जातो . केमो पोर्ट हे IV पेक्षा सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम औषध देण्याचे काम करते. हे एकदा शरीरात लावल्यास कपड्याखाली झाकल्यामुळे दिसूनही येत नाही. केमो पोर्ट हे आवश्यकतेनुसार अनेक आठवडे, महिने किंवा वर्षांपर्यंत एका ठिकाणी राहू शकते. जेव्हा गरज नसते तेव्हा ते काढता येते.
पेनलेस कीमोथेरेपी मध्ये केमो पोर्टचे फायदे काय आहेत?
पेनलेस कीमोथेरपी मध्ये योग्य प्रकारे औषधांचा डोस शरीरात जाणे खूप महत्वाचे असते. IV कॅथेटरच्या प्रक्रियेत अनेकदा हे औषध बाहेर येणे किंवा योग्य प्रकारे वितरीत न होण्याचे प्रमाण जास्त असते. पण केमो पोर्ट मुळे या गोष्टी घडत नाहीत. केमोपोर्ट योग्य प्रकारे औषध वितरीत करतो.
केमो पोर्ट साइट निर्जंतुकीकरण तंत्राने तयार केली जाते. या तंत्रात सर्व पृष्ठभाग सूक्ष्मजीवांपासून मुक्त असल्याची खात्री केली जाते. त्यामुळे रुग्णाला कुठल्याही प्रकारचा संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. संसर्ग न झाल्याने रुग्णाच्या वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.
केमो पोर्टचा वापर द्रव, औषधे आणि रक्तसंक्रमण वितरीत करण्यासाठी वापरली जाते हे माहितीच आहे. पण या शिवाय प्रयोगशाळेच्या चाचणीसाठी रक्त काढण्यासाठी, पीईटी आणि सीटी स्कॅनसाठी डाई इंजेक्ट करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.
पोर्टमुळे औषधांचा त्वचेच्या संपर्कात येण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे त्वचेला कुठल्याही प्रकारचा त्रासदायक संसर्ग होत नाही. त्वचेला वेदना होत नाहीत.
कीमोथेरपी सारखे अनेक दिवस चालणारे उपचार प्रदान करण्यासाठी केमो पोर्टचा वापर केला जाऊ शकतो. केमो पोर्ट चा वापर केल्याने पेनलेस कीमोथेरपी ही सहज शक्य आहे. प्रो लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये पेनलेस कीमोथेरपी उपचार केले जातात . आता पर्यंत अनेक रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे.
डॉ. सुमित शाह
डॉ. सुमित शाह प्रोलाइफ कैंसर सेंटर एंड रिसर्च इंस्टीट्यूट (Prolife Cancer Center and Research Institute) संस्थापक आहेत. या सेंटरमध्ये एकाच छताखाली सर्व आधुनिक कर्करोग उपचार केले जातात.डॉ. शाह हे पुण्यातील काही कर्करोग तज्ञांपैकी एक आहेत. ज्यांच्याकडे सर्जिकल ऑन्कोलॉजीमध्ये ही मान्यताप्राप्त पदवी आहे. ते मुख्य सल्लागार, सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन(Surgical Oncology and Laproscopic Surgeon) आहेत. त्यांनी कॅन्सर सेंटर वेल्फेअर होम येथे सुपर स्पेशालिटी कोर्स केला आहे.डॉ. सुमित शहा यांनी 20000 हून अधिक कर्करोग रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग कॅन्सर सर्जन म्हणून सन्मानित केले गेले आहे.
डॉ. सुमित शाह शिक्षण : डीएनबी (जनरल सर्जरी), डीएनबी (सर्जिकल ऑन्कोलॉजी) लेप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये फेलोशिप केलेले आहेत.